Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 82 कोरोनाबाधितांची भर, 05 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 22 जण कोरोनामुक्त





परभणी
➡️ जिल्ह्यात 28 आॅगस्ट रोजी सांयकाळी 07 वाजता प्राप्त अहवालानुसार दिवसभरात आज 82 जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. तसेच आज 05 कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि 22 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाले एकूण संख्या 109 झाली आहे. आजपर्यंत 02 हजार 360 रुग्ण पाॅझिटिव्ह निघाले आहे. आजपर्यत 943 कोरोनामुक्त झालेले आहे.

05 कोरोनाबाधितांचा मृत्यू - 
परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट येथील 65 वर्षीय महिला, मानवत येथील एकता नगरातील 77 वर्षीय पुरूष, जिंतूर येथील 70 वर्षीय महिला, पालम तालुक्यातील ताजवाडी येथील 55 वर्षीय पुरूष व पूर्णा शहरातील गवळी गल्लीतील 56 वर्षीय पुरूष असे एकूण तीन पुरूष व दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती शासकीय रुग्णालयाने दिली.

22 कोरोनामुक्त रुग्णामध्ये -
 
परभणी शहर 12  सेलु शहर 04, मानवत ग्रामीण 05, सोनपेठ शहर 01 असे 12 पुरुष आणि 10 महिला एकूण 22 जण कोरोनामुक्त झाले आहे.

82 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये - 
गंगाखेड शहरातील 06, गंगाखेड ग्रामीण 06, पूर्णा शहर 05, पूर्णा ग्रामीण 01, पाथरी शहर 01, परभणी शहरात 38, परभणी ग्रामीण 03, जिंतूर 17, सोनपेठ शहर 01 व सोनपेठ ग्रामीणमधुन 04 असे असे 54 पुरुष आणि 28 महिला असे 82 जणांचा अहवाल आज पाॅझिटिव्ह आला आहे.



Post a Comment

0 Comments