Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

चाकू हल्ला प्रकरणात एकास पोलिस, तर दोघांना न्यायालयीन कोठडी




सेलू  ➡️ सेलू येथील चाकू हल्ला प्रकरणातील पोलिसानी तीन आरोपीना अटक केली. त्यातील एका आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी तर अन्य दोघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली.
    प्राप्त माहितीनुसार सचिन राठोड व शुभम् बरकुले या दोघांना किरकोळ कारणातून गुरुवारी (दि.27) रात्री त्याचा मित्र असलेला अनिल फुलारी, अभिजीत राठोड, मनोज गोरे यांनी चाकूने भोसकून जखमी केले. या घटनेत सचिन राठोड हा गभीर जखमी तर शुभम् बरकुले हाही जखमी झाला होता. या घटनेची माहिती समजताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केले. यात गंभीर जखमी असल्याने सचिन राठोड यास परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करता भरती केले गेले. या संदर्भात शुभम् बरकुले याने सेलू पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त हे करीत आहेत. तिघांही आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने अनिल फुलारी यास तीन दिवसांची पोलिस कोठडी तर अभिजीत राठोड, मनोज गोरे या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली.




Post a Comment

0 Comments