Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड जिल्ह्यात 215 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू





नांदेड ➡️ शुक्रवार 28 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 168 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 215 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 164 बाधित आले.

05 जणांचा मृत्यू  - गुरुवार 27 ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालय नांदेड येथे वासरी येथील 49 वर्षाचा पुरुष, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे पानभोसीरोड कंधार येथील 42 वर्षाचा पुरुष, हुनगुंदा ता. बिलोली येथील 45 वर्षीय महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे कुरुळा ता. कंधार येथील 40 वर्षाचा पुरुष, शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालय नांदेड येथे लोकमित्रनगर नांदेड येथील 88 वर्षाचा पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

168 बरे झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथील 12, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 7, देगलूर कोविड केअर सेंटर 14, बिलोली कोविड केअर सेंटर 15, किनवट कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 70, लोहा कोविड केअर सेंटर 7, माहूर कोविड केअर सेंटर 1, मुदखेड कोविड केअर सेंटर 3, मुखेड कोविड केअर सेंटर 11, कंधार कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयातील 6 असे एकूण 168 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

215 पॉजिटिव्ह कोरोनाबाधितांमध्ये - आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 18, अर्धापूर तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात 4, लोहा तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 3, परभणी 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 8, धर्माबाद तालुक्यात 6, हिंगोली 1 असे एकुण 51 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 93, भोकर तालुक्यात 1, बिलोली येथे 12, देगलूर येथे 6, किनवट येथे 2, कंधार येथे 9, उमरी येथे 1, नायगाव येथे 2, नांदेड ग्रामीण येथे 7, मुदखेड येथे 4, हदगाव येथे 3, लोहा येथे 1, माहूर येथे 1, मुखेड येथे 12, धर्माबाद येथे 9, परभणी येथे 1 असे एकुण 164 बाधित आढळले.

1 हजार 543 बाधितांवर औषधोपचार सुरु - यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 182, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 575, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 59, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 25, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 39, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 139,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 28, लोहा कोविड केअर सेंटर येथे 39, हदगाव कोविड केअर सेंटर 44, भोकर कोविड केअर सेंटर 12,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 31,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 53, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 19, मुदखेड कोविड केअर सेटर 24,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 7, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 48, उमरी कोविड केअर सेंटर 33, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 148 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 10, निजामाबाद 1, मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  




Post a Comment

0 Comments