Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

भारतात पहिल्या तिमाहीतच कोरोनावर लस उपलब्ध असेल - रिपोर्ट




नवी दिल्ली  ➡️ एका अहवालामध्ये दावा करण्यात आला आहे की भारतात 2021 च्या पहिल्या त्रैमासिकात कोरोनावर लस तयार होईल. वॉल स्ट्रीट रिसर्च आणि ब्रोकरेज फर्म, बर्नस्टीन रिसर्चने गुरुवारी दिलेल्या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) पहिली लस उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे तयार (Serum Institute) आहे. भारत भागीदारीच्या मार्गाने चारपैकी दोन लसी मिळवण्यात यशस्वी होईल.

ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाला या वर्षाच्या अखेरपर्यंत मान्यता

ऑक्सफर्ड / एस्ट्राजेनेकाचे व्हायरल व्हॅक्टर आणि नोवावॅक्सचे प्रोटीन सब-यूनिट लस या वर्षाच्या अखेरपर्यंत मान्यता मिळवेल. जागतिक पातळीवर अशा चार लसी आहेत ज्या 2020 च्या अखेरीस किंवा २०२१च्या सुरुवातीला मान्यता मिळवण्याच्या जवळ आहेत. अहवालात सांगण्यात आले आहे की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणांचा डेटा या दोन लसींसाठी सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक प्रतिरक्षा प्रतिक्रिया प्राप्त करण्याच्या लसीच्या क्षमतेसाठी आशादायक दिसत आहे.

भारतात कोव्हिड-१९च्या तीन लसींचे परीक्षण चालू

सीरम इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित ऑक्सफर्ड कोव्हिड-19 लसीचे दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षण बुधवारी भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झाले. रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली की ज्या 02 स्वयंसेवकांना भारतातील पहिली गोळी देण्यात आली आहे आणि कोव्हिशील्ड म्हटले जात आहे त्यांची तब्येत सामान्य आहे. एका महिन्यानंतर हा डोस परत देण्यात येईल. गुरुवारी या चिकित्सा संस्थेत आणखी तीन व्हॉलेंटियर्सला ही लस देण्यात आली. सध्या भारतात SARS-CoV-2 विषाणूवरच्या तीन लसींची तपासणी चालू आहे.

२०२१मध्ये सीरम करू शकेल कोव्हिड-19च्या 600 मिलियन लसींचा पुरवठा
जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ही 2021 मध्ये 600 मिलियन लसींचा तर 2022 मध्ये एक बिलियन लसींचा पुरवठा करू शकेल. यातील 400 ते 500  मिलियन लसी 2021 मध्ये भारताच्या गवीच्या फर्मच्या प्रतिबद्धतेच्या संदर्भात उपलब्ध व्हायला हव्यात. अहवालात असाही अंदाज लावण्यात आला आहे की सरकारी किंवा खासगी बाजारात लसीचे प्रमाण 44:55 असेल. या महिन्याच्या सुरुवातीला सीरम इन्टिट्यूटने घोषणा केली आहे की कोव्हिशील्ड लसीची किंमत जास्तीत जास्त 03 डॉलर प्रति डोस असेल आणि ही लस गवीच्या कोव्हॅक्स अॅडव्हांस मार्केट कमिटमेंटसह 92 देशांमध्ये उपलब्ध करण्यात येईल.

तीन अन्य भारतीय कंपन्या करत आहेत कोव्हिडच्या लसीवर काम
अहवालामध्ये किमान 03 अन्य भारतीय फार्मा कंपन्या- Zydus Cadila, Bharat Biotech आणि Biological E यांनाही सूचिबद्ध करण्यात आले आहे ज्या त्यांच्या स्वतःच्या लसीवर काम करत आहेत आणि सध्या पहिल्या आणि दुस-या मानवी चाचणीच्या टप्प्यावर आहेत. अहवालानुसार भारत दरवर्षी वेगवेगळ्या लसींचे जवळपास 2.3 बिलियन डोसचे उत्पादन करतो.

निम्न आणि मध्यम प्राप्ती असलेल्या देशांचाही विचार
फक्त भारतच नाही, तर निम्न आणि मध्यम प्राप्ती असलेल्या देशांचाही विचार एसआयआय करत आहे. सीरम या देशांसाठी कोव्हिड-19 च्या लसींचे 100 मिलियन डोसचे उत्पादन आणि वितरणात वेग आणण्यासाठी गवी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागिदारी करत आहे. आज जगातील सर्व देश भारताकडे आशेने बघत आहेत. जगभरात सुमारे 200 कोव्हिड-19 लसींवर काम सुरू आहे आणि किमान 07 लसी तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीत आहेत.







Post a Comment

0 Comments