Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणारे 44 हजार जणांकडून पोलिसांकडून कारवाईत 99 लाख रुपयांचा दंड वसूल




परभणी ➡️ कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करण्यासह मोटार वाहन कायद्याअंतर्गत परभणी जिल्हा पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणा‍या एकूण 44 हजार 183 जणांकडून 99 लाख 69 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस प्रशासनकडुन शनिवारी देण्यात आली.
    कोरोना संसर्गाबाबत संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे दि. 24 मार्चपासून ते 27 ऑगस्ट पर्यंत नियमांचे उल्लंघन करणा‍यांविरूध्द परभणी पोलिसांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत 01 हजार 64 गुन्ह्यातील 03 हजार 460 आरोपींविरूध्द कारवाई करण्यात आली. त्यातील 01 हजार 75 आरोपींना अटक करण्यात आले. तर 164 जणांविरूध्द न्यायालयात खटले दाखल करण्यात आले. त्यातील 62 आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. 10 जुलै 2020 आॅगस्ट पासून मास्क न लावता फिरणार्‍या 07 हजार 31 जणांविरूध्द 14 लाख 99 हजार 550 रुपयांचा दंड लावण्यात आला. तर सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणा‍या 06 हजार 700 वाहनचालकांविरूध्द दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून 15 लाख 35 हजार 900 रुपये वसूल करण्यात आले. 24 मार्चपासून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणा‍या 26 हजार 992 वाहनचालकांविरूध्द दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून 69 लाख 34 हजार 150 रूपये वसूल करण्यात आले.




Post a Comment

0 Comments