Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शनिवारी शहरासह जिल्ह्याभरातील मंदिरासमोर घुमला घंटानाद आंदोलन





परभणी ➡️ राज्यभरातील सर्व मंदिरे भक्तांकरिता खुली करावी, या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेने पुकारलेल्या घंटानाद आंदोलनास शनिवारी शहरासह जिल्ह्याभरात जोरदार प्रतिसाद मिळाला. परभणी शहरातील विविध भागातील 42 मंदिरामधून पदाधिका-यांसह कार्यकर्ते व भक्तांनी या आंदोलनात उर्स्फुेतपणे प्रतिसाद नोंदविला.
    विश्‍व हिंदू परिषदेच्या एका शिष्टमंडळाने या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठविले. त्याद्वारे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गेल्या पाच महिन्यांपासून राज्य सरकारने भक्तांकरिता मंदिरे बंद केली आहेत. परिणामी सर्वसामान्य भक्तगण, जनता श्रध्देपासून वंचीत आहे. आजघडीला राज्य सरकारद्वारे दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाते. सर्व आर्थिकक्षेत्रे खुली झाली आहेत. परंतू संतांच्या भूमीतील श्रध्दा केंद्रे उघडण्याबाबत आंदोलनाची वेळ आल्याबद्दल विश्‍व हिंदू परिषदेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी या निवेदनाद्वारे तीव्र खंत व्यक्त केली. या घंटानाद आंदोलनाद्वारे राज्य सरकार ताळावर येईल व सर्व मंदिरे खुली करेल, असा विश्‍वास या पदाधिका-यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने मंदिरे भक्तांसाठी खुली न केल्यास विश्‍व हिंदू परिषदेतर्फे उग्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा प्रांतमंत्री अनंत पांडे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, लक्ष्मीकांत क्षीरसागर, जिल्हामंत्री सुनील रामपूरकर, महानगर जिल्हाध्यक्ष राजकुमार भांबरे, कार्याध्यक्ष प्रल्हादराव कानडे,अभिजीत कुलकर्णी, बजरंग दलाचे देवगिरी प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे, गोपाळ रोडे आदीनी दिला.

परभणी शहरातील मंदिरासमोर घुमला घंटानाद आंदोलन
    कारेगाव रस्त्यावरील व्यंकटेश नगरातील बालाजी मंदिरसमोर नरेंद्र उजंळबरकर, देशमुख कॉर्नर जवळील गणपती मंदिरासमोर, रामकृष्ण नगरातील नवश्या हनुमान मंदिर, गांधीपार्कात श्रीराम मंदिरासमोर सुरेंद्र शहाणे, अशोक डहाळे, सुहास डहाळे,सुरेद्र टाक प्रसाद कुलकर्णी, जिंतूर रस्त्यावरील अष्टविनायक गणपती मंदिरासमोर व दत्तनगरातील चौंडेश्‍वरी मंदिरासमोर बापुराव सूर्यवंशी, दैठणकर, प्रल्हादराव कानडे ,  विद्यानगरातील सिध्दीविनायक मंदिरासमोर ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, अभिजीत कुलकर्णी, स्टेशन रस्त्यावरील पेढा हनुमान मंदिरासमोर प्रांतमंत्री अनंत पांडे, जिल्हामंत्री सुनील रामपूरकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, महानगर जिल्हाध्यक्ष राजकुमार भांबरे, प्रल्हादराव कानडे,रघुवीरसिंग टाक, अशोक काळदाते, श्री.वैद्य पेढा हनुमान मंदिराचे पुजारी निलेश तिवारी, जगदीश तिवारी, संदीप भंडे, नंदुकमार यन्नावार आदीच्या उपस्थितीत घंटानाद करण्यात आला.




Post a Comment

0 Comments