Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

रामेटाकळीच्या तलाठ्यास एक हजाराची लाच घेताना पकडले




परभणी ➡️ मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील तलाठी राजकुमार उत्तमचंद शर्मा (वय 51 रा. सहकार नगर, परभणी) यास शेतक-याकडून एक हजार रुपयांची लाच घेताना आज सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी त्याच्या खाजगी कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.                     पोहंडुळ येथील शेतक-याच्या सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करून देण्यासाठी गटाप्रमाणे प्रत्येकी 500 रुपये त्याने मागितले होते. यापूर्वी त्याने 500 रुपये शेतक-यांकडून उकळले होते. राहिलेले 1 हजार रुपये घेताना लाचखोर तलाठी जाळ्यात सापडला. याबाबत लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर 14 ऑगस्टला पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज दुपारी सापळा रचून 1000 रुपये संबंधित शेतक-याकडून स्वीकारताना तलाठी शर्मा यास पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भारत हुंम्बे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल कडू, पोलिस हवालदार जहागीरदार, अनिल कटारे, हनुमंते, सारिका टेहरे, शकील, कुलकर्णी आदींच्या पथकाने केली आहे.






Post a Comment

0 Comments