Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मनपा कर्मचारी उद्या घरोघरी जाऊन श्री गणेश मूर्ती संकलित करणार




परभणी ➡️ शहर महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड-19 मुळे उद्भवेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून परभणी शहरातील साथरोग प्रतिबंधीत अधिनियम-1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 लागू असून यावर्षी श्री गणेश उत्सव साजरा करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. शहरातील गणेश विसर्जनाबाबत परभणी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन यांनी दि.29/8/2020 रोजी बैठक घेण्यात आली.         या बैठकीत मार्गदर्शन सूचनेप्रमाणे परभणी शहर महापालिकेने गणेश विसर्जन साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणालाही श्री गणेश मुर्तीचे विसर्जनाची मिरवणुक काढता येणार नाही. महापालिकेच्या वतीने घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळ मुर्तीचे संकलन व विसर्जनासाठी वाहनाची महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर वाहनाने नागरिकांच्या घरी जावून श्री गणेश मुर्तीचे व निर्माल्याचे संकलन करून त्याचे विसर्जन वसमतरोडवरील जलशुध्दीकरण केंद्र येथे तयार आलेल्या कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे.                       सोमवारी त्या कृत्रिम तलावाची पाहणी आयुक्त देविदास पवार, पाणीपुरवठा विभागप्रमुख तन्वीर बेग, शेख इस्माईल, सहाय्यक आयुक्त सुधाकर किंगरे, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड यांनी पाहणी केली. विविध उपाययोजना करण्यात आल्या. यावेळी आयुक्त देविदास पवार यांनी महापालिका आपल्या दारी या संकल्पनेतून घरोघरोजावून मनपाचे कर्मचारी श्रींच्या मुर्तीचे संकलन करणार आहेत. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घरा बाहेर पडू नये. सकाळी 10 वाजेपर्यंत आरती करून घ्यावी. त्यानंतर संकलनास सुरूवात होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संकलन करण्यात येणार आहे. यासाठी सहाय्यक आयुक्त सुधाकर किंगरे, शिवाजी सरनाईक, संतोष वाघमारे, श्रीकांत कांबळे, सहाय्यक आयुक्त गायकवाड, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मेहराज अहेमद, नयनरत्न घुगे, शेख शादाब, लक्ष्मण जोगदंड हे परिश्रम घेत आहेत.





Post a Comment

0 Comments