Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मेडिकल प्रवेशच्या फॉर्म्युल्या विरोधात आजपासून स्वाक्षरी मोहीम राबवणार- खा.संजय जाधव




परभणी  ➡️ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेकरिता वेळप्रसंगी संघर्षही करू, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सोमवारी परभणीत एका पत्रकार परिषदेतून व्यक्त केली. वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आपला पाठपुरावा सुरूच राहणार असुन वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून घेऊच, असा विश्वासही खासदार जाधव यांनी या प्रसंगी व्यक्त केला. वैद्यकीय महाविद्यालयास राज्य व केंद्र सरकारद्वारे तत्वा मान्यता आहे. यादृष्टीने हालचालीसुध्दा मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत.
     महाविद्यालयाकरिता जागेच्या बाबत आपण जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याबरोबर चर्चा केली आहे. लवकरच महाविद्यालयाकरिता नियोजीत जागा हस्तांतरीत केली जाईल, असा विश्वास खासदार जाधव यांनी व्यक्त केला. वैद्यकीय महाविद्यालय परभणीत स्थापन होणे ही काळाची गरज आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात 550 खाटा आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी जे काही निकष लागतात त्यात परभणी परिपूर्ण आहे, असे स्पष्ट करीत खासदार जाधव यांनी या महाविद्यालच्या स्थापनेबाबत मागील आठवड्यातच मुंबई दौर्‍यातून आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. 
    वैद्यकीय महाविद्यालयाबाबतद आपला भक्कम असा पाठपुरावा राहील. वेळप्रसंगी या संघर्षाचीही भूमिका घ्यावयास आपण आपण मागे-पुढे पाहणार नाहीत. संघर्ष केल्याशिवाय परभणीला काहीही मिळालेले नाही. त्यामुळे संघर्ष करावा लागला तर तोही करू, पण वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेऊच, अशीही भूमिका त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात राज्य सरकारद्वारे 70: 30 चा लावला जाणारा फॉर्मुला हा घोर अन्याय करणारा आहे. त्या विऱोधातही आपण आवाज उठवला असुन मंगळवारपासून (दि.एक) मोठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याद्वारे जनशक्तीचा रेटाद्वारे उभा केला जाईल. सर्वपक्षी मंडळी यात निश्रि्चतच उतरतील, असे ते म्हणाले. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आमदारांनी या विषयात भक्कम अशी तयारी करीत विधीमंडळात या विषयाच्या अनुषंगाने आवाज उठवावा, असे आवाहनही केले.




Post a Comment

0 Comments