Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

बंद हॉटेलमध्ये कामगाराची आत्महत्या; दोन महिने लटकत होता मृतदेह




पुणे ➡️ लॉकडाऊनमध्ये सोलापूर-पुणे रोडवरील बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या हॉटेल कामगाराने जेवण न मिळाल्याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना रविवारी ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मृतदेह तब्बल दोन महिने लटकत होता. यामुळे आपोपाप त्याचे मुंडके गळून बाजूला पडले. लॉकडाऊनच्या काळात गावाकडे जाण्याची सोय न झाल्याने हा कामगार हॉटेलमध्ये राहत होता. इथे खायला अन्न मिळाले नाही म्हणून त्याने स्वयंपाक घरात गळफास घेतला.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकातील हॉटेल रुची लॉकडाऊन लागू झाल्यानंतर २४ मार्चपासून बंद होते.  हॉटेलच्या मूळ मालकाने हे हॉटेल इतर दोघांना चालविण्यास दिले होते. या हॉटेलमध्ये परराज्यातील तीन कामगार काम करत होते, परंतू गावाकडे जाण्यासाठी दोन कामगारांना पास मिळाला. त्यामुळे पास न मिळाल्याने एक कामगार हॉटेलमधेच राहिला होता.लॉकडाऊनच्या सुरुवातीला बाहेरुन मिळणाऱ्या जेवणावर दिवस काढले. जेवण जेव्हा बंद झाले, तेव्हा हताश होऊन त्याने हॉटेलच्या स्वयंपाकघरात अँगलला साडी बांधून गळफास घेतला. ३० ऑगस्ट रोजी सकाळी आसपासच्या नागरिकांनी दुर्गधी येत असल्याची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्याच्या कागदपत्रावरून त्याचे नाव कुलदिपसिंग सोलसिंग मरावी असे असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर. बाडीवाले, ढाकणे, व्ही. जी. माने, ए. जी बोरकर, ए. ई. जाधव तपास करीत आहेत.

 




Post a Comment

0 Comments