Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गंगाखेडातील संचारबंदीत पुन्हा वाढ जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे आदेश




परभणी, दि.27 जुलै:- करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गंगाखेडमध्ये पुन्हा दोन दिवस संचारबंदी वाढवली आहे. अटी व शर्ती पाहिल्याप्रमाणेच असणार आहेत. गंगाखेड मधील कोरोना बाधितांची वाढलेली प्रचंड संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी लावलेली गंगाखेड येथील संचारबंदी आज सोमवारी संपणार होती. त्यात दोन दिवसाची वाढ करण्यात आली आहे. दिनांक 29 जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आज सायंकाळी काढले आहेत. संचारबंदी आदेश गंगाखेड शहर नगरपालिका व लगतच्या 3 किमी परिसरात लागू राहतील.




Post a Comment

0 Comments