Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गंगाखेड पाठोपाठ पूर्णा व सेलूत ही कोरोना रुग्णांत वाढ




परभणी,दि.28 जुलै:- जिल्ह्यात गंगाखेड शहरापाठोपाठ पूर्णा व सेलू शहरात सुध्दा एकापाठोपाठ एक कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. पूर्णा शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेेदिवस वाढत आहे. सोमवारी रात्री पुर्णा शहरातील शास्त्री नगरातील 72 वर्षीय महिला, रेल्वे क्वॉर्टरमधील 45 वर्षीय पुरूष, आनंद नगरातील 55 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 33 वर्षीय तरूण आणि 47 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सेलूत सुध्दा रॅपीड अ‍ॅन्टीजन किट्सद्वारे संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्यात एक रुग्ण बाधित आढळून आला. सेलूतील पारीख कॉलनीत आतापर्यंत 10 रुग्ण बाधित आढळले आहेत. परभणी शहरात लोकमान्य नगरातील 45 वर्षीय पुरूष, नांदखेडा रस्त्यावरील 62 वर्षीय पुरूष, काद्राबाद प्लॉट भागातील 36 वर्षीय पुरुष, धार रस्त्यावरील 60 वर्षीय महिला व विद्यानगर भागातील 34 वर्षीय पुरूष बाधित आढळून आला. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून आज दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी आलेल्या अहवालात परभणी शहरातील 4 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यात जिल्हा कचेरीतील 1 कर्मचारी व मनपाच्या 3 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 560 झाली आहे. यातील 25 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.





Post a Comment

0 Comments