Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात आज दिवसभरात 15 पॉझिटिव्ह वाढले





परभणी दि.27 जुलै:- परभणी शहरातील इंदिरा गांधी नगर परिसरातील रहिवासी 48 वर्षीय पुरुषाचा सोमवार पहाटे दोनच्या सुमारास कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात 15 बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 532 झाली आहे. यातील 24 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
    परभणीत मृत्यू झालेल्या रुग्णाला 23 जुलै रोजी दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याला मधुमेह व फुफुसाचा जंतू संसर्ग होता. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आज 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात परभणीतील रंगनाथ नगर, गालिब नगर, सरोजनी नायडू नगरातील 3, पालम येथील लोहा रोड व महावीर नगरातील 3, गंगाखेड येथील शेटे गल्लीतील 1, सेलूतील पारिख कॉलनी, महावीर नगरातील 2 रुग्णांचा तसेच जिंतूर शहरातील हनुमान चौंक येथील एका रुग्णाचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील कोळसा गावातील 53 वर्षीय व्यक्तीही परभणीत बाधित आढळल्याने त्याची नोंद जिल्हा रुग्णालयात घेण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 532 पॉझिटिव्ह आढळले असून 252 रुग्ण बरे झाले आहेत. आज 13 रुग्णांना सुटी देण्यात आली. नव्याने आज 43 संशयित रुग्णालयात दाखल झाले आहेत. आजपर्यंत एकूण 4 हजार 416 संशयितांची नोंद झाली आहे. रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 289 जण आहेत. विलगीकरण केलेले एकूण 625 रुग्ण आहेत.




Post a Comment

0 Comments