Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लोककलांवतांच्या माध्यमातून कोवीड-19 प्रबोधन आरंभ




परभणी, दि. 27 जुलै :- शहर महानगरपालिकेच्यावतीने शहरामध्ये कोवीड-19 अंतर्गत शहरातील नागरिकांत जनजागृती व्हावी या दृष्टीने वासुदेव, गोंधळी, वाघ्या मुरळी, लोककलांवतांच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धास्ती बसली आहे. हा संसर्ग थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर याबाबत दुर्लक्ष करून नये. यामुळे नागरिकांना समजेल अशा भाषेत व लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचा निर्णय मनपाने घेतला आहे. शहरातील लोककलावंतांनी देखील यासाठी पुढाकार घेतला असता त्यांना मानधन देण्यात येत आहे. मागील चार ते पाच दिवसापासून शहरातील वसाहतीमध्ये वासुदेव टाळकरी आणि ढोलकी घूमत आहे. असे 25 पथके शहरातील विविध भागामध्ये 55 जणांमार्फत जनजागृती करीत आहेत. तसेच जनजागृतीसाठी शिक्षक देखील घरोघरी फिरून जनजागृती करत नागरिकांच्या नावनोंदणीचे काम करीत आहेत. यासाठी वर्ग 1 ते 3 अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली असून ते देखील आपल्या परिसरात फिरत आहेत. प्रभागातील नगरसेवक व शिक्षकांच्या माध्यमातूनही जनजागृती होत आहे.
    शहरात 32 गोंधळी, 22 वासुदेव,मसनजोगी आदी लोककलावंत लक्ष्मीकांत क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गाण्यांच्या माध्यमातून सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विविध वसाहतीमध्ये जनजागृती करतांना दिसत आहेत. नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क लावून गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन महापौर अनिता सोनकांबळे, आयुक्त देविदास पवार, उपमहापौर भगवान वाघमारे, स्थ्लृायी समिती सभापती गुलमीर खान, सभागृह नेते माजूलाला, विरोधी पक्षनेते विजय जामकर,गटनेते मंगला मुद्गलकर, चंद्रकांत शिंदे, सुभाना चांद जाकेरलाला आदींनी केले आहे.





Post a Comment

0 Comments