Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पतंगाने कापली अभिजीतच्या आयुष्याची दोर, राष्ट्रीय स्तरावरील कलावंत अभिजीत लगडचा मृत्यू




परभणी, दि.27 जुलै :- अमेय नगरात रहिवासी आणि पोट्रेट कलाकार अभिजीत केशव लगड हा 26 जुलै रोजी सांयकाळी आपल्या दोन मजली गच्चीवरून पतंग उडवित होता. त्यांचा अचानक तोल जाऊन तो खाली पडल्याने जागीच गतप्राण झाला. येथील बाल विद्यामंदिर मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले केशव लगड यांचा अभिजित हा एकुलता एक मुलगा. यावर्षी तो बाराव्या इयत्तेत प्रवेश केला होता. शिल्पकला व पोट्रेट याबाबतीत तो अव्वल कामगिरी करीत होता. दोन वर्षांपूर्वी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या महोत्सवातही त्याने आपला सहभाग नोंदवला होता. 
 



Post a Comment

0 Comments