Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नाने सन्मानित करून, आर्टीची स्थापना करावी





नांदेड, दि. 30 जुलै : -
  मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत जेवढे साहित्यिक होऊन गेलेले आहेत, अशा साहित्यिकांपैकी, विचारवंतांपैकी अण्णा भाऊसाठे यांनी आपल्या लिखीत वाङ्‌मयाद्वारे मराठी साहित्यविश्व समृद्ध करण्याबरोबरच साहित्यक्षेत्रामध्ये भारतदेशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम करणारे जागतिक कीर्तीचे थोर साहित्यिक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी सांगता होत आहे. हे औचित्य साधून अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा किताब देऊन सन्मानित करण्यात यावे, तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील मोठ्या उदात्त सामाजिक हेतूने बार्टी या स्वायत्त संस्थेची निर्मिती करण्यात आली, परंतु त्या सामाजिक उदात्त हेतूनाच हरताळ करत, तिलांजली देत बार्टीचे प्रशासन हे विशिष्ट अशा एकाच जातीचे हित जोपासत बार्टी मार्फत आयोजित एम.पी.एस.सी./यू.पी.एस.सी. सपर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थी निवड, प्रशिक्षण केंद्र चालविणेसाठी खाजगी संस्थेची निवड करणे किंवा बार्टीमार्फत समतादूताची निवड करणे या व इतर बार्टीच्या उपक्रमाचा लाभ हा अनुसूचित जातीतील सक्षम अशा विशिष्ट घटकांनाच मिळवून देऊन, अनुसूचित जातीतील मागास, वंचित अशा 58 जाती या बार्टीच्या उपक्रमाच्या लाभापासून वंचित राहिल्या असल्यामुळे, अनुसूचित प्रवर्गातील वंचित जातींचा सर्वांगीन विकास व्हावा, या दुर्लक्षित जातीही विशेष त्या विकासासाठी व उत्थानासाठी आणि एकंदर या जातीसमूहदेखील विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि सर्व पात्र मुलामुलींना प्रशिक्षित करून सक्षम बनवून पर्याप्त संधी मिळावी, यासाठी या मागास घटकासाठी काम करणारी स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणजे अनुसूचित जातीतील मागास, वंचित अशा 58 जातीकरिता संशोधन व प्रशिक्षणाचे काम होणेसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करावी व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे या थोर साहित्यिकास भारतरत्न हा किताब, जन्मशताब्दी वर्षांच्या जयंतीपूर्वी म्हणजे 1 ऑगस्ट 2020 पूर्वी केंद्र शासनाने प्रदान करण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे राज्यातील शेकडो लोकप्रतिनिधी, आमदार/खासदार, मंत्री, माजी मंत्री, विधान सभा अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी शिफारस केलेल्या लेखी पत्रांची दखल घेऊन, महाराष्ट्र शासनाने आर्टीची स्थापना करावी व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा किताब मिळणेसाठी, केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेकडे अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे व प्रदेशाध्यक्ष, संपादक उत्तम बाबळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आज मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचेमार्फत करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात आंदोलनाचे सतीश कावडे, उत्तम बाबळे, ऍड. बी.एम. गायकवाड, परमेश्वर बंडेवार, दयानंद बसवंते, बालाजी गऊळकर, माणिक कांबळे, सुरेश कांबळे, विठ्ठल घाटे, गोपाळ वाघमारे, सर्जेराव वाघमारे, नागेश तादलापूरकर, सचिन गाडे, आनंद वंजारे, पांडुरंग सूर्यवंशी, गौतम वाघमारे, विक्रम वाघमारे, आकाश बुरूडे, बालाजी इरेवाड, पत्रकार संजय गायकवाड, गौतम शिरसाठ, शिवाजी नुरूंदे, मारोजी शिकारे, प्रदीप घाटे, पांडुनरंग ढोके, व्यंकट सूर्यवंशी, आईलवार इत्यादींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments