Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मनपाच्या वतीने काळीकमान येथील भाजी विक्रेत्यांची रॅपीड टेस्ट





परभणी, दि. 30 जुलै :- शहर महानगर पालीकेच्या वतीने वसमत रोड येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ गेट समोरील भाजी व फळ विक्रेते यांची रॅपीड अ‍ॅटीजन टेस्ट करण्यात आली. आयुक्त देविदास पवार यांनी स्वत: पाहणी केली. उपायुक्त रविंद्र जायभाय,डॉ. कल्पना सावंत, सहा.आयुक्त सुधाकर किंगरे, मु.स्व.निरीक्षक करण गायकवाड, स्व.नि.शेख शादाब, लक्ष्मण जोगदंड, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
   शहरातील वसमत रोड येथील काळी कमान समोरेील भाजी विक्रेत्यांची मनपा आरोग्य कर्मचारी रॅपीड अँटीजन किटवर चाचणी पुढील तीन दिवस कऱणार आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने रॅपीट किटवर कोरोना चाचणी करण्यात आली.  आरोग्य विभागमार्फत डॉक्टर, कमर्चारी, परिचारीका, नर्स, आशा स्वयसेविका आदींच्या तापासण्या कऱण्यात येणार आहे. सोशल डिस्टंसींगचे पालन करण्यात यावे गर्दी करू नये. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत.  डॉ. प्रविण रेंगे, डॉ. उजमा हुसैन खान, डॉ. आरती देऊळकर, डॉ. सुनिल उन्हाळे, डॉ.कलीमा बेग, डॉ.आयशा समरीन, भंडारविभाग रामेश्वर कुलकर्णी, अमोल जाधव, आदींच्या उपस्थितीमध्ये रॅपीड अ‍ँटीजन टेस्ट घेण्यात आली. 




Post a Comment

0 Comments