Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड जिल्हात आणखीन एक आमदार कोरोना पॉझिटीव्ह




नांदेड, दि. 30 जुलै :- माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमधील नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे हे कोरोनामुक्त झाल्यानंतर विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला, असून त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या शेजारी आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे बसले होते. तेव्हा मात्र जवळगावकर यांचा स्वॅब निगेटीव्ह आला होता. मागच्या तीन ते चार दिवसांपासून कोरोनाची लक्षणे आढळून येत असल्याने नांदेडच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा स्वॅब पाठविण्यात आला होता. बुधवारी रात्री आमदार जवळगावकर यांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे जवळगावकर यांनी उपचार सुरु केले होते. अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना गुरुवार दि. 30 जुलै रोजी मुंबई हलविण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक सुभाष राठोड यांनी दिली.
जिल्हयातील काँग्रेसमधील पालकमंत्री व तीन आमदार आतापर्यंत कोरेाना पॉझिटीव्ह आले आहे. यात अमर राजूरकर व माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपचार सुरु आहेत.



Post a Comment

0 Comments