Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली करा जिल्हाधिकारी मुगळीकर यांना मनसेचे साकडे




जिल्हाधिकारी मुगळीकर यांना मनसेचे साकडे
परभणी, दि.28 जुलै:- परभणी येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कामात लक्ष नसल्याच्या कारणाने अनेक अप्रिय घटना वारंवार घडत आहेत. या घटनांची सखोल चौकशी करून जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली करावी किंवा त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका निवेदनाद्वारे केली आहे.
        या निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रशासन वैद्यकीय अधिकारी यांना पाठीशी घालत आहे. अधिकारी हे शासनाचा निधी कागदोपत्रिच खर्च करून सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. याची चौकशी करण्यात यावी, परभणी येथे वेळेवर डायलीसीस न केल्यामुळे ३५ वर्षिय रामदास आदोडे या इसमाचा २० जुलै रोजी मृत्यू झाला. माळी गल्लीतील मनपा कर्मचारी याचा कोरोना रिपोर्ट बाधीत दाखवून कोविड वार्डात ठेवण्यात आले.
        उलट या रुग्णास कोरोनाची लागण झाली असती तर कोण जबाबदार होते ? असा सवाल विचारण्यात आला. तसेच यावर सखोल चौकशी करण्यात यावी, जी बोगस समिती नेमण्यात आली आहे, ती रद्द करण्यात यावी, अधिकारी हेच स्वत: जबाबदार असल्यास चौकशी नि:पक्षपातीपणे कशी होईल? असा सवाल विचारण्यात आला. वारंवार चुका होऊनही जिल्हा शल्यचिकित्सक हे केवळ कागदोपत्री व्यवहार करण्यात व्यस्त आहेत. त्यांची बदली करण्यात यावी किंवा त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष सचिन पाटील, शहर उपाध्यक्ष पिंटू कोल्हे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष वेदांत पुरंदरे, सचिन शिंदे, शेख शफीक, लखन पवार, रामु पवार व शुभम टेहरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



Post a Comment

0 Comments