Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

महानगर पालीकेच्या वतीने रॅपीड टेस्ट सुरु




परभणी, दि.28 जुलै:- शहर महानगर पालीकेच्या वतीने शहरातील भाजी व फळ विक्रेते किराणा व्यापारी यांची रॅपीड अ‍ॅटीजन टेस्ट करण्यासाठी आपत्ती व्यवस्खापन कायदा 2007 व साथ रोग 1897 लागू झालेला आहे.
        त्या अनुसरून मनपाच्या कार्यक्षेत्रात कोवी्ड 19 आजारााया प्रादुर्भावामुळे शहरातील सर्व आशा स्वंयसेवीका, आरोग्य कर्म्रचारी यांची बैठक घेण्यात आली. 27 जुलै रोजी बैठक घेवून शहरात सहा पथके निर्माण केली असून आज शहरातील सीटीक्लब हॉल येथे मनपा आरोग्य केर्मचारी रॅपीड अँटीजन किटवर चाचणी पुढील तीन दिवस करणार आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने रॅपीट किटवर कोरोना चाचणी करण्यास मंगळवार 28 जुलै पासून सीटीक्लब स्टेशन रोड येथून सुरुवात करण्यात आली. मंगळवार आणि बुधवार असे दोन चाचणी चालणार आहेत. आरोग्य विभागमार्फत डॉक्टर, कर्मचारी, परिचारीका, नर्स, आशा स्वयसेविका आदींच्या तापासण्या करण्यात येणार आहे. सोशल डिस्टंसींगचे पालन करण्यात यावे गर्दी करू नये.
    मंगळवारी दु. 12 वा. तपासणीस सुरुवात झाली. यावेळी उपायुक्त रविंद्र जायभाये,उपायुक्त गणपत जाधव,आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत.  डॉ. प्रविण रेंगे,डॉ. उजमा हुसैन खान,डॉ.आरती देऊळकर,डॉ. सुनिल उन्हाळे,डॉ.कलीमा बेग, डॉ. आयशा समरीन, भंडार विभाग रामेश्वर कुलकर्णी ,गजानन जाधव, अमोल जाधव आदींच्या उपस्थितीमध्ये रॅपीड अ‍ँटीजन टेस्ट घेण्यात आली. यावेळी आयुक्त देविदास पवार यांनी रॅपीड अ‍ॅटीजन टेस्ट करण्यासाठी भाजी विक्रेते,व्यापायांना नागरिकांना आवाहन केले. महापौर सौ.अनिता कांबळे, आयुक्त देविदास पवार उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजुलाला, स्थायी समिती सभापती गुलमीर खान आदींनी केले आहे.





Post a Comment

0 Comments