Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कुणी कितीही आक्षेप घेतला तरी शाळा सुरू करणारचं: विजय वडेट्टीवार




चंद्रपूर, दि.28 जुलै:- राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं शाळा कधी सुरु होणार हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या समोर आहे.चंद्रपूर जिल्ह्यात 4 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केले आहे.
     जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून ज्या गावात आणि शाळेत कोणीही संस्थात्मक क्वारंटाईन नसेल तिथेच शाळा सुरू होणार आहे. मात्र कुणी कितीही आक्षेप घेतला तरी शाळा सुरू करणारचं, असे सांगत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यातील इंग्रजी माध्यम आणि इतर कॉन्व्हेंट शाळांच्या ऑनलाइन शिक्षणाबाबत कुठलाही वाद नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पालकांकडे कुठलाही आधुनिक मोबाईल नाही. त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवाहापासून दूर जाता कामा नाही ही आपली भूमिका आहे. यासाठी नियमावली तयार करणार असून गेले एक महिनाभर ज्या गावात अथवा शाळेत कुणीही संस्थात्मक विलगीकरणात नाही अशा गावात शाळा सुरू केल्या जाणार आहेत. याशिवाय शाळामध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल, त्यांना मास्क उपलब्ध करून दिले जातील, अंतरावर बसवले जाईल, शाळा सॅनिटाईझ केल्या जाणार आहे.




Post a Comment

0 Comments