Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  नृसिंह विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा




 

परभणी ➡️ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. (VNS-PBN-SAT)



यावेळी अध्यक्ष स्थानी प्राचार्य पी.बी.शेळके तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक अशोक कांबळे, नानासाहेब पवार, बुजुर्गे आदिंची उपस्थिती होती. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भित्तिपत्रकाचे विमोचन आणि इंडियन सेफ्टी आर्मी प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.याप्रसंगी श्रीकांत वाघ, ओंकार शिंदे, श्रीहरि मोधळ यांनी इंडियन आर्मी सेफ्टी प्रयोग करुण दाखविला.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. 




तसेच  इयत्ता आठवीच्या शिवानी वाघ,पंकजा वाघ तर सहावी वर्गातील श्रद्धा एडके,अंजली वाघ,सोनाक्षी वाघ, जान्हवी शिंदे, वैष्णवी वाघ,आरती एडके,आदीती टिपरकर, समृद्धि मोधळ, आणि नववि वर्गातील रुपाली जोरवर, कोमल बोनेवाड, अक्षरा एलकेवाड, जान्हवी चव्हाण,जास्मिन शेख,हिना बागवान, राजनंदिनी मोरे  अदि विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांच्या विषयी उत्कृष्ट भित्तिपत्रकाचे लेखन केले होते. विद्यार्थ्यांना रामप्रसाद अवचार यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर तर आभार शैलेश ढगे यांनी मानले.





कार्यक्रम यशस्वीतेसाठी लक्ष्मीकांत जोगेवार, गोपाळ मोरे, राजू दीपके, प्रा.वसंत लोखंडे, प्रा.संजय गजमल, सुनील गवई, रामप्रसाद अवचार, शंकर मुंढे, गणेश धोपटे, राजेभाऊ मोरे, बळीराम बानायत, ज्ञानोबा दुधाटे,नारायण एलकेवाड, वैजनाथ गिराम अदिनी परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments