Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ भौतिकी विज्ञानाच्या संशोधनाची व्याप्ती अमर्याद - डॉ.एम.के.पाटील






  • श्री शिवाजी महाविद्यालयात संपन्न झाले ई-आंतरराष्ट्रीय चर्चसत्र


परभणी ➡️ भौतिकी विज्ञानाच्या संशोधनाची व्याप्ती अमर्याद असल्याने विद्यार्थी आणि संशोधकांना अनेक संधी उपलब्ध असून भौतिकी विज्ञान हा विषय सध्या जागतिक पातळीवर अभ्यासकांना आकर्षित करीत असल्याचे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.एम.के.पाटील यांनी मंगळवार (दि.२७) रोजी केले. (vnsnews24, feature ) 





येथील  श्री शिवाजी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वतीने आयोजित ई-आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते. यावेळी संयोजक उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, संयोजन सचिव डॉ.सुरेंद्र येनोरकर, सहसचिव डॉ.विजय कळमसे, प्रा.रविशंकर झिंगरे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.पाटील म्हणाले, आज नॅनो विज्ञान, बायो विज्ञान, अवकाश विज्ञान,इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रात भौतिकी विज्ञानाचा वापर होतो आहे. त्यामुळे या क्षेत्राची व्याप्ती नक्कीच वाढली आहे. उत्पादन क्षमता वाढविणे, विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती तसेच अंतराळ क्षेत्र यासारख्या क्षेत्रात भौतिकी विज्ञानाचा वापर वाढलेला दिसत आहे असेही ते यावेळी म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात चालणाऱ्या संशोधन प्रकल्पांची माहिती देत संशोधनाला महाविद्यालय कसे वाव देते हे सांगून सहभागी अभ्यासकांचे स्वागत केले.



या चर्चासत्रात  शारजाह येथील अमेरिकन विद्यापीठातील डॉ.पाशा सय्यद यांचे मूलभूत सूक्ष्म पदार्थाचा प्रगत संवेदनाच्या क्षेत्रात उपयोग या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन झाले. दुसऱ्या सत्रात इंग्लंड मधील डरहम विद्यापीठातील संशोधक डॉ.गंगाधर बाणपानवार यांनी ऑरगॅनिक ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स या तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती दिली. तर तिसऱ्या  सत्रात झेक रिपब्लिक येथे कार्यरत असलेल्या डॉ. मेघा देशमुख यांनी सूक्ष्म तंत्रज्ञान हे हरित ऊर्जेसाठी भविष्य कसे ठरू शकते यासंबंधी विवेचन केले. 




या चर्चासत्राचा समारोप स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. कमलाकर कणसे तसेच उपप्राचार्य डॉ .रोहिदास नितोंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. या चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, सूत्रसंचालन डॉ .विजय कळमसे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेंद्र येणोरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ .जी बी गुंडलेवाड यांनी करून दिला. यावेळी संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments