Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री शिवाजी महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेस प्रतिसाद







परभणी ➡️  शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा शुक्रवारी (दि.१६)  संपन्न झाली.(vnsnews24, feature ) 


या स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचा किशन जाधव प्रथम, मणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय  छ. संभाजीनगरचा खरात स्वप्नील द्वितीय,  ग्रंथालय व महितीशास्त्र महाविद्यालय, नांदेडचा कसबे नितीन तृतीय, तर उत्तेजनार्थ म्हणून कदम शीतल आणि डांगरे अंजली हिस मिळले. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख पाच हजार, द्वितीय येणाऱ्यास दोन हजार पाचशे तर तृतीय येणाऱ्यास दीड हजार रुपये आणि  प्रशस्तीपत्र देण्यात आले. 



सदरील स्पर्धेचे उदघाटन आणि बक्षीस वितरण महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, परीक्षक डॉ.दत्ता शिंदे, डॉ.गणेश मारेवाड, इंजि.अजित तरवटे, प्रा.रविशंकर झिंगरे, समन्वयक डॉ.प्रल्हाद भोपे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. 



कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रल्हाद भोपे, सूत्रसंचालन प्रा.अतुल समींद्रे तर आभार डॉ.राजू बडूरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मंजिरी भाटे, डॉ.दिगंबर रोडे, डॉ.नानासाहेब शितोळे, डॉ.जयंत बोबडे, डॉ.विजय परसोडे,प्रा.सविता कोकाटे, डॉ.वृषाली फुके, प्रा.अनिल बडगुजर, प्रा.सारिका पासंगे, प्रा.अंकुश खटिंग, डॉ.अमोल गवई,बाळकृष्ण पोखरकर, सय्यद सादिक, साहेबराव येलेवाड आदींनी पुढाकार घेतला.







Post a Comment

0 Comments