Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री शिवाजी महाविद्यालयात संगणक कार्यशाळेस प्रतिसाद





परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र आणि ट्रेनिंग ॲड प्लेसमेंट विभागाच्या वतीने मंगळवार रोजी आयोजित एक दिवसीय संगणक कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. (vnsnews24, feature ) 



या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.सागर शर्मा यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.एच.एस. जगताप, समन्वयक डॉ.पी.के.विभूते, विभागप्रमुख प्रा.डी. एन. पटवारी आदींची उपस्थिती होती.



उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.सागर शर्मा म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षित ज्ञानात भर टाकीत कौशल्याधिष्ठित बनविणे काळाची गरज आहे. जागतिक स्तरावरील कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करता येते. अशा प्रशिक्षणाच्या मदतीने विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत रोजगार मिळू शकतो असा आशावाद व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात डॉ.श्रीनिवास केशट्टी म्हणाले, संगणक क्षेत्रात रोज नवीन बदल होत आहेत ते बदल शिकून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे.या स्पर्धेच्या जगात स्वतःला अद्ययावत ठेवून इच्छित ध्येय प्राप्त करा असा सल्लाही त्यांनी दिला. 





कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी.के.विभूते, सूत्रसंचालन प्रा.एस. एम.सुर्वे तर आभार डॉ.शेख एम.ए.रहमान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जी.के.चालींद्रवार, डॉ.विजय कळमसे, तुकाराम धोपटे, नरेंद्र माडे आदींनी योगदान दिले. बीसीए, बीएस्सी तसेच बीसीएस पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यशाळेसाठी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments