Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिंतूर येथे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त 122 झाडांचे वृक्ष संगोपन




जिंतूर - महाराष्ट्राचे  वनमंत्री  आर्य वैश्य समाजभूषण  श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या 61व्या वाढदिवसा निमीत्त महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या आवाहना नुसार राज्यभर दि 30जुलै रोजी वृक्षा रोपण करण्यात आले त्याच अनुषंगाने जिंतूर येथे 122वृक्ष लाऊन संगोपन जबाबदारी घेण्यात आली. (vnsnews24, feature ) 



जिंतूर येथे बि. डी. कोकडवार यांच्या परिवारातर्फे पांगरी येथील फार्म हाऊस वर 61 वां वाढदिवस असल्याने 61झाडे वृक्ष लागवड करून संगोपन करण्याची जबाबदारी घेण्यात आली तर एम आय डी सी परिसरातील वैभव ऑईल मिल येथे ही 61वृक्ष लावण्यात आले तत्पूर्वी सकाळी श्री नगरेश्वर मंदिर येथे  वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दीर्घ आयुष्य  लाभण्यासाठी अभिषेक प्रार्थना करून श्री हनुमान चालीसा पाठ संपन्न झाला.




वृक्ष संगोपन कार्यक्रमात शहरातील 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले या वेळी संत श्री महेश महाराज जिंतूरकर, तहसीलदार राजेश सरोदे, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर, मुकुंद सावजी कळमकर, समाजाचे अध्यक्ष सखाराम चिद्रवार,राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार  झाड फाऊंडेशन चे अँड मनोज सारडा नगरेश्वर मंदिर चे अध्यक्ष किरण वट्टमवार   मुकुंद कोकडवार, संजय कोकडवार, मंदार कोकडवार, मयूर कोकडवार, प्रणव कोकडवार. वैभव वट्टमवार  सह  समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments