Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  सुयोग इंग्लिश स्कुल व ज्यु. कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न





परभणी ➡️ शांतीनगर दर्गारोड, येथील सुयोग इंग्लिश स्कुल व ज्यु. कॉलेजमध्ये नुकताच इ.10 वी व  इ. 12 वी मध्ये विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (vnsnews24, feature ) 




या विद्यार्थ्यामध्ये इ. 12 वीचे विद्यार्थी आनिष पेंढारी 90.33 %, श्रावणी झंवर 88.50%,  आभिषेक हांडे 86.17%, त्याचबरोबर इ.10 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यामध्ये आदिती कांदे 95.40%, सिध्दी पिंपळे 89.20% व श्रावण घुले 84.20% यांचाही सत्कार  श्री समर्थ खटकेश्वर सेवाभावी संस्थेचे साचिव प्रा.डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला. 



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री समर्थ खटकेश्वर सेवाभावी प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.डॉ पंकज अबोटी होते तर प्राचार्य डॉ विठ्ठल घुले व  प्राचार्य सिध्दार्थ गवई यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी विद्यार्थ्यांनी गुणात्मक प्रगतीपेक्षा ज्ञानात्मक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले. 





तसेच येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 बद्दल सुद्धा उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व होणाऱ्या बदलाचा सकारात्मक दृष्टिकोणातून फायदा घेऊन जीवनात यश मिळवावेअसे अवाहन केले.  




यावेळी  प्रा डॉ. पंकज अबोटी, अमजद शेख, केशव कांदे  इ. मान्यवरांनी विद्यार्थ्याचे आभिनंदन करून त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटसालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन अमीन मुजावर यांनी केले तर आभार सुचिता थोरवटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंजली झरकर, नारायण सुर्यवंशी, मनोज कुलकर्णी, शुभम पाठक, हिराबाई बोरकर आदींनी प्रयत्न केले.






Post a Comment

0 Comments