Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  मेडिकव्हर हॉस्पिटल येथे ‘ओपन-हार्ट’ ला पर्यायी ‘ की-होल बायपास सर्जरी’ सुविधा उपलब्ध






छत्रपती संभाजी नगर ➡️  पारंपारिक ओपन-हार्ट शस्त्रक्रियेऐवजी आता छातीत लहान चीरांद्वारे केली जाते. त्याला "की-होल हार्ट सर्जरी" किंवा ज्याला "मिनिमली इनव्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी (MICS ) " असे ही म्हणतात. हे ऑपरेशनाची सेवा येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. अशी माहिती डॉ. मनीष पुराणिक यांनी दिली आहे. 



डॉ. मनीष पुराणिक म्हणाले कि,  की-होल हार्ट सर्जरी मध्ये  कुठलेही हाड फ्रॅक्चर न करता किंवा पूर्ण छाती न उघडता दोन फासळ्यांमधून अगदी लहान चिर देऊन  दुर्बिणीच्या साहाय्याने हृदय शस्त्रक्रिया केली जाते. हि शस्त्रक्रिया अति प्रगत समजल्या जाणाऱ्या ऍनेस्थेशिया टेक्निक, रिजनल ऍनेस्थेशिया तसेच विशेष उपकरणांच्या मदती ने केली जाते.या पद्धतीने  शस्त्रक्रियेमुळे कोरोनरी धमनी मधील अडथळे यशस्वीपणे दूर करण्यात आणि त्यांच्या हृदयात रक्त प्रवाह पूर्ववत करण्यासाठी बायपास ग्राफ्ट टाकण्यात येतात.





या पद्धतीच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला वेदनारहित शस्त्रक्रियेचा अनुभव होतो. या पद्धतीने एक पासून 4 ते 5 ब्लॉक्स ची बायपास केली जाते, साधारणता बायपास लागणाऱ्या 80% रुग्णांमध्ये या प्रकारे हृदय शस्त्रक्रिया करणे शक्य आहे, बायपाससाठी लागणाऱ्या हाताच्या व पायांच्या नसादेखील एन्डोस्कोप च्या मदतीने काढल्याने रुग्णांना व्रण होत नाहीत व हालचाली करण्यात कुठलाही अडथळा रहात नाही, अशी माहिती या प्रसंगी डॉ. मनिष पुराणिक  यांनी दिली. 




डॉ. मनिष पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली हृदय शल्य चिकित्सा विभागा तर्फे की-होल द्वारे मल्टी अरटेरिअल बायपास, मल्टिपल वॉल्व रिप्लेसमेंट व एंडोस्कोपिक वेसल हार्वेस्ट सिस्टिम या सुविधा प्रदान करणारे मध्य महाराष्ट्रात मेडिकव्हर हॉस्पिटल्स छत्रपती संभाजीनगर हे एकमेव ठिकाण आहे. मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली योग्य ते निदान व उपचार केले जातात. 




ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन औषधोपचारांची गरज असेल त्यांच्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या आणि उच्च शिक्षित वैद्यकीय स्टाफच्या देखरेखेखाली उपचार केले जातात. आधुनिक सुखसोयी आणि तंत्रज्ञान यांचा जोड असलेले मेडिकव्हर हॉस्पिटल हे रुग्णांसाठी सर्वसमावेशक पर्याय म्हणून काम करत आहे. अशी माहिती केंद्र  प्रमुख निरंजन जोशी यांनी दिली आहे.







Post a Comment

0 Comments