Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री गजानन महाराजांच्या पालखीत स्वच्छते विषयी जनजागृती





परभणी ➡️ आषाढी एकादशी वारी निमित्त वारकरी आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने पालखी सोहळ्यात स्वच्छतेच्या जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आधारित जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कार्यालयाच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात येत आहे. (vnsnews24, feature ) 





गुरुवार दि. 8 जून 2023 रोजी शेगांव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी परभणी जिल्ह्यात दाखल झाली आहे. सदर पालखीत माहिती पुस्तिका, पोस्टर आणि  स्वच्छता चित्ररथाच्या माध्यमातून वारकरी आणि नागरिकांना पाणी, आरोग्य, स्वच्छता, जल जीवन मिशन अशा विविध विषया बद्दल माहिती देण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्वच्छता चित्ररथाचे उदघाटन स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 





यावेळी स्वच्छ भारत मिशन कार्यालयातील लेखाधिकारी प्रताप जावळे, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ अनिल मुळे, संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, शालेय स्वछता तज्ज्ञ अविनाश आरळकर, संगणक चालक राजेंद्र कोचुरे, विलास दुधमल, तालुकास्तरावरील समूह समन्वयक संजय पंडीत, विजय प्रधान यांची उपस्थिती होती. गुरुवार दि 8 जून ते रविवार दि.11 जून 2023 रोजी पर्यंत संत गजानन महाराजांची पालखी परभणी जिल्ह्यात असणार आहे.  









Post a Comment

0 Comments