Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  सुदाम भोसले सेट परीक्षा उत्तीर्ण




परभणी ➡️ पूर्णा तालुक्यातील बानेगावचे रहिवासी सुदाम गणेश भोसले हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. (vnsnews24, feature ) 



त्यांनी परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात पदवीचे शिक्षण घेऊन मध्यप्रदेश मधील अमरकंटक येथील इंदिरा गांधी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी हे यश संपादन केले आहे.




त्यांना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.पंडित निर्मळ, डॉ.जयंत बोबडे आदींचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सरपंच मारोती गुळवे, उपसरपंच विशाल भोसले, पंडितअण्णा भोसले, शंकर ठोंबरे, अजय टाक आदींनी अभिनंदन केले.




Post a Comment

0 Comments