Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/25 लोकांवर कोटपा कायदा अंतर्गत दंडात्मक कारवाई






परभणी ➡️ जिल्हा रुग्णालय परिसरात कोटपा कायदा कलम 4 नुसार तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थांचे सेवन करणारे नागरिक 25 लोकांवर दंडात्मक कारवाई करत 2610 रुपयांचा दंड वसूल करण्यात आली. (vnsnews24, feature ) 




जिल्हाधिकारी आचल गोयल  व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बन,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. जयश्री यादव व डॉ. कल्याण कदम  निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जून 2023 ते 24 जून 2023 पर्यंत सार्वजनिक ठिकाणीं तंबाखू विरोधी धाडसत्र आयोजित करण्यात आले होते. 




कोटपा कायदा 2003 नुसार कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखु गुटखा खाणे ,बाळगणे या विरोधी कायदा आहे ,कलम 5 नुसार तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात करणे बंदी आहे.  


सामान्य रुग्णालय  परिसरातील उल्लंघन करणाऱ्या वर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या कारवाई  वारंवार करण्यात याव्यात असे मत व्यक्त केले. तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन आणि वापरामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येतेच आणि सार्वजनिक मालमत्तचे नुकसान देखिल होते. तसेच या मुळे विविध साथीचे रोग पसरण्यास सुरुवात होते. 




यामुळे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते असे जिल्हा तंबाखू नियंत्रण अधिकारी यांनी सांगीतले. कार्यवाहीत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षचे केशव गव्हाणे, किशोर नंद,अधिकारी, पोलीस अधिकारी  जी.जी. गायकवाड, व  एस जी कालवने आणि विभागीय अधिकारी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छ संभाजी नगर श्री अभिजीत सांघाई  यांच्या संयुक्त पथकाने सदरील कार्यवाही केली.







Post a Comment

0 Comments