Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सलीम इनामदार यांचा सत्कार संपन्न





परभणी ➡️ वीर वारकरी सेवा संघ आयोजित रमजान ईद महोत्सवाचा निमित्त लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक सलीमोद्दीन इनामदार यांचा हार श्रीफळ प्रमाणपत्र देऊन गौरव सत्कार करण्यात आला आहे. (vnsnews-24, feature, parbhani )




यावेळी अध्यक्षस्थानी गोपाळा फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष खराटे, प्रमुख पाहुणे समाजहित अभियान  प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद अंभोरे,   रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणीचे अध्यक्ष दिलीप बनकर,   लोकश्रेय महीला शहर आघाडीच्या कोमल खरात भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ,  महोत्सवाचे संयोजक बालाजी आयुर्वेदिक केंद्राचे संचालक डॉ.गोविंद कामटे सत्कार समारंभाचे आयोजक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन परभणी अध्यक्ष तथा राम कृष्ण हरी मित्र मंडळ मुख्य अधिकारी) सामाजिक कार्यकर्ते सर्फराज शेख आदी उपस्थित होते.





मान्यवरांचे समयोचित भाषणे झाली तर सत्कारास उत्तर देतांना सलीम इनामदार यांनी सत्कार म्हणजेच राज्य तील देशातील व आपण ज्या राज्यात जिल्ह्यात शहरात गावात रहात असतात. त्या परिसरातील सुजाण व बुद्धीवादी समाजाने आपल्या कार्याची घेतलेली दखल म्हणजेच सत्कार अशा शब्दात  सत्कार प्रसंगी उत्तर  दिले व हिंदु व मुस्लिम हे भारत देशाची दोन चाके आहेत. म्हणून तर आज विर वारकरी संघ महाराष्ट्र प्रणीत राष्ट्रजन फाउंडेशन परभणी रमजान ईद महोत्सव 2023 हिंदु मुस्लिम भाई भाई सन्मान केल्या बद्दल या कार्या चा गौरव ही सलीम इनामदार यांनी केले आहे.







Post a Comment

0 Comments