Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ पैसाच्या वादातूर कुऱ्हाडीने वार करून मुलानेच केला बापाचा खून; आरोपीस अटक




परभणी ➡️ वडील घर खर्चाला पैसे न देता त्यांच्या मित्रासोबत दारू पिवून पैसे उडवत असल्याचा याचा राग मनात धरुन त्यांच्या मुलानेच कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर व खांद्यावर मारुन खून केल्याचे तपासात समोर आले आहे. यातील मयताचे नाव दत्तात्रय देवीदास भोकरे (वय 58 वर्ष रा. ताडबोरगाव ता. मानवत) असे आहे. यातील आरोपी परमेश्वर दत्तात्रय भोकरे (वय 28 वर्ष रा. ताडबोरगाव ता.मानवत जि. परभणी) याच्याविरोधात मानवत पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली आहे.(vnsnews - 24, feature, parbhani) 



या प्रकरणी बाबासाहेब ऊर्फ बाबाशा दत्तात्रय भोकरे (रा. ताडबोरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दि. 24 एप्रिल रोजी रात्री 9 ते दि.25 एप्रिल रोजी सकाळी पावनेबारा वाजेच्या दरम्यान  ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेतात दत्तात्रय देवीदास भोकरे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. 




मानवत पोलिस ठाण्याचे बिट अंमलदार पोह भारत नलावडे , नामदेव पवार,राजु इंगळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देखील घटनास्थळी जावून पाहणी केली आणि मयत व्यक्तीची संपूर्ण माहिती काढली. त्यात हा मृत्यू म्हणजे खूनच असल्याचे स्पष्ट झाले. 



24 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळेस यातील आरोपी परमेश्वर भोकरे याने त्याचे वडील दत्तात्रय देविदास भोकरे हे घर खर्चाला पैसे न देता त्यांच्या मित्रासोबत दारू पिवून पैसे उडवत होते याचा राग मनात धरुन कुऱ्हाडीने,   हत्याराने त्यांच्या मानेवर व खांद्यावर मारहाण करुन खून केला. या आशयाच्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटकही करण्यात आलेली आहे. मानवत ठाण्याचे पोनि स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोउपनि किशोर गावंडे हे पुढील तपास करीत आहेत.





Post a Comment

0 Comments