Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणीत जिल्हाधिकार्‍यांंचा ‘पीए’ असल्याचे भासवून व्यापार्‍याला 2 लाखास गंडविले




परभणी ➡️ जिल्हाधिकारी यांचा ‘पीए’ असल्याचे भासवून जिल्हा कचेरीतील सर्व कर्मचार्‍यांना ड्रेस कोडनुसार कपड्यांचे वाटप करायचे आहे, असे सांगत विश्वास संपादन करुन एका व्यापार्‍याजवळील 2 लाख 10 हजार रुपयांची रोकड घेवून भामटा पसार झाला आहे. हा प्रकार दिनांक 27 एप्रिल रोजी गुरुवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात घडला. यात सीसीटीव्हीमध्ये हा भामटा कैद झाला असून त्याआधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.(vnsnews-24, crime, parbhani ) 

 



प्राप्त माहितीनुसार फिर्यादी दुकान मालकाचे नाव कैलास टिकमदास तुलसानी त्यांचे परभणी शहरातील अष्टभुजा मंदीर चौकात शगुन कलेक्शन या नावाचे कपड्याचे दुकान आहे. आज 27 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक 35 वर्षीय इसम त्यांच्या दुकानात आला. संबंधिताने ‘मी जिल्हाधिकार्‍यांचा पी.ए. आहे, जिल्हाधिकार्‍यांना आपल्या कर्मचार्‍यांसाठी काही कपडे घ्यायचे आहेत, असे म्हणून सॅम्पल दाखविले.





त्यानंतर दुकान मालकाने दोन सॅम्पल आपल्या दुकानातील नोकराकडे देवून संबंधित इसमासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले. या ठिकाणी भामट्याने आपण कार्यालयीन कर्मचारी आहोत, असे दर्शवून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दालनात ये- जा केली. 




त्यानंतर संबंधित भामटा नोकरासोबत पुन्हा शगुन कलेक्शन या दुकानावर आला. जिल्हाधिकार्‍यांना कपडे पसंत पडले असून 45 ड्रेस काढण्यास सांगितले. याचे बिल 90 हजार झाले. जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा आहेत, जिल्हाधिकार्‍यांना पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये चिल्लर हवी आहे, तुम्ही काही रक्कम सोबत घ्या, असे म्हणून दुकान मालक कैलास तुलसानी यांना 2 लाख 10 हजार रुपये सोबत घेण्यास सांगितले. 




त्यानंतर दुकानदारास सोबत घेवून तो भामटा बिनदिक्कतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात फिरला. मी जिल्हाधिकारी यांचा पी.ए. आहे, असे सांगून भामट्याने व्यापार्‍याचा विश्वास संपादन केला. व्यापार्‍याला घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात आलेला भामटा हा कार्यालयात सर्वच विभागात बिनदिक्कतपणे फिरत होता. 




त्याच्या वागण्या-बोलण्यावरुन कोणालाही संशय आला नाही. भरदिवसा जिल्हाधिकारी कार्यालयात त्याने व्यापार्‍याची रक्कम लंपास केली. दुकान मालक व भामटा हे जिल्हाधिकारी कार्यालयात सोबतच आले. याठिकाणी भामट्याने विश्वास संपादन करत दुकान मालकाजवळून 2 लाख 10 हजार रुपये घेतले. फोनवर बोलण्याचा बहाणा करत भामटा रक्कम घेवून निघून गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर घडला प्रकार कैलास तुलसानी यांनी मित्रमंडळींना सांगितला. त्यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही माहिती देण्यात आली. 






Post a Comment

0 Comments