Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक संचलनात सहभाग





परभणी  ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विजय गरुड, ओमकेश भोकरे या दोन विद्यार्थ्यांची २६ जानेवारी रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन राज्यस्तरीय पथसंचलनात सहभागी झाले होते. (vnsnews-24, gov, parbhani ) 



सदरील सचलनासाठी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एकाच महाविद्यालयांतून या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. २६ जानेवारी रोजी झालेल्या पथसंचलनात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.





विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रिनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ. विजया ना॑दापुरकर,गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, कार्यक्रमाधिकारी डॉ. तुकाराम फिसफिसे, डॉ डिग॑बर रोडे, प्रा.सविता कोकाटे, प्रा. राजेसाहेब रेंगे,प्रा.विलास कुराडकर आदींनी अभिनंदन केले.








Post a Comment

0 Comments