Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/परभणीत कुष्ठरोग जनजागृतीसाठी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न





💠जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच हस्ते हिरवा झेंडा

परभणी ➡️ ‘कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात’ हे यंदाचे घोषवाक्य असून, नियमित उपचाराने कुष्ठरोग बरा होतो, याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान 2023 आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आज जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथून सुरु झालेल्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले. तत्पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. (vnsnews-24, gov, parbhani ) 





ही मॅरेथान स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल ते विद्यापीठ गेट व परत जिल्हा क्रीडा संकुल अशी 5 किलोमीटर होती. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर अबालवृद्धांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. पाराजी बाबुराव गायकवाड  यांनी प्रथम पारितोषक तर रामेश्वर विजय मुंजाळ यांनी द्वितीय आणि विष्णू विठ्ठलराव लव्हाळे यांनी तिसरे पारितोषिक प्राप्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. राहुल गिते यांच्या हस्ते विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली





प्रकल्प अधिकारी रश्मी खांडेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, मनपाच्या आरोग्य अधिकारी कल्पना सावंत, जिल्हा मॅरेथॉन संघटनेचे सदस्य रणजित काकडे आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन महादेव यांनी केले.








Post a Comment

0 Comments