Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ व श्री शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने परभणीत राज्यस्तरीय कवी संमेलन उद्या





परभणी ➡️ अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आणि श्री शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार (दि.२९) रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार आहे.



महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव असणार आहेत. 



मुख्य अतिथी ज्येष्ठ कवयित्री तथा मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललिता गवांदे, विशेष अतिथी मराठी साहित्य मंडळ विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कुलकर्णी, नागपूरच्या ज्येष्ठ कवयित्री लता हेडाऊ, डॉ. विश्वास वाळवी, गंगाधर भुसारे, डॉ. सुरेश कदम, शंकर मानवतकर यांची उपस्थिती असणार आहे. 




राज्यस्तरीय कवी संमेलन कवी डॉ. घ.ना. पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. निमंत्रित कवयित्री अंजली कांबळे (वर्धा) मधुकर भीमराव (ठाणे) यांचे काव्यवाचन होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठी साहित्य मंडळ परभणीचे आयोजक जिल्हाध्यक्ष व  कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष डॉ. संगीता आवचार, सचिव डॉ. प्रल्हाद भोपे, उपाध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड व डॉ. विलास पाटील, सदस्य डॉ. राजीव यशवंते, प्रा. राम कटारे, प्रा. स्वाती देशमुख व शहराध्यक्ष सौ. अनुराधा वायकोस यांनी केले आहे.









Post a Comment

0 Comments