Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ डॉ. मुठ्ठे पी.आर. यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार जाहीर





नांदेड ➡️ महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा - राज्यस्तरीय स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत विविध विभागात दिले जाणारे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्या अंतर्गत करिअर कट्टाचा -  उत्कृष्ट जिल्हा समन्वयकाचा पुरस्कार डॉ.मुठ्ठे पी.आर. यांना जाहीर झाला आहे. (vnsnews-24, education, nanded) 



डॉ.मुठ्ठे पी.आर. हे यशवंत महाविद्यालयात पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  डॉ.मुठ्ठे  हे करिअर कट्टा चे नांदेड जिल्हा समन्वयक म्हणूनही कार्यरत असून त्यांनी करिअर कट्टा उपक्रम जिल्हाभर राबवण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.  करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी गठीत केलेल्या 'यूपीएससी राज्य समिती सदस्य'  म्हणूनही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. डॉ.मुठ्ठे यांचे विद्यार्थी आर्थिक साक्षरता अभियान राज्यस्तरीय समिती सदस्य म्हणूनही आर्थिक साक्षरता प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य राहिले आहे.  





ते यशवंत महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संयोजक म्हणूनही सक्रिय कार्य करत असून ते करिअर कट्टा अंतर्गत यशवंत महाविद्यालयास मंजूर झालेल्या 'मॉडेल जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे' आणि 'इंक्युबॅशन सेंटरचे' संयोजक म्हणून प्राचार्य डॉ.जी.एन.शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कार्य करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची जनजागृती निर्माण व्हावी आणि त्यांना विविध परीक्षांची नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी  मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याकरिता धडपडणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून मुठ्ठे यांची ओळख आहे.  





डॉ.मुठ्ठे यांनी विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी अनेक आर्थिक साक्षरता अभियान कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनही केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल माजी शिक्षण राज्यमंत्री तथा श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव डी.पी.सावंत, सहसचिव ॲड.उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ.रावसाहेब शेंदारकर, नरेंद्र चव्हाण, प्राचार्य डॉ.  गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.अजय गव्हाणे, करिअर कट्टाचे राज्य समन्वयक यशवंत शितोळे, विभागीय समन्वयक डॉ.सतीश चव्हाण, श्रीकांत देशमुख, ग्रामीण जिल्हा समन्वयक डॉ. संतोष शेंबाळे,  सर्व सहकारी,  मित्र तथा विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.









Post a Comment

0 Comments