Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सेलू तालुका शालेय व्हॉलीबॉल/खो-खो/कबड्डी क्रीडा स्पर्धा, श्रीराम प्रतिष्ठान क्रीडा संकुल थाटात येथे संपन्न





खेळाडूंनी आपली गुणवंता खेळातून दाखवावी: डॉ. संजय रोडगे 

सेलू ➡️ जिल्हा क्रीडाधिकारी परभणी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सेलू  यांच्या वतीने आयोजित शालेय व्हॉलीबॉल  क्रीडा स्पर्धाचे शानदार उद्घाटन श्रीराम प्रतिष्ठान क्रीडा संकुल  येथे दि. २१ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. 




श्री राम प्रतिष्ठान सेलू अध्यक्ष डॉ.संजय रोडगे म्हणाले खेळाडूंनी आपली गुणवंता खेळातून दाखवावी, मैदानावर येऊन सातत्याने सराव करावा, मोबाईल पासून दुर राहावे. सेलू तालुका क्रीडा संकुलात सुविधा उपलब्ध करून दिल्यास क्रीडायम  वातावरण निर्माण होईल. खेळाडूंना  क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मदत होईल व्हावे असे उद्गार काढले.




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ संजय रोडगे प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, पर्यवेक्षक प्रा. नागेश कान्हेकर , तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे ,प्रा. के.के.कदम, प्रिंन्स इंग्लिश प्राचार्य कार्तिक रत्नाला, क्रीडा मार्गदर्शक सतिश नावाडे उपस्थित. 




व्हॉलीबॉल स्पर्धाच्या १४/१७/१९/ वर्षांखालील मुले व मुलीच्या गटात स्पर्धा संपन्न झाल्या. 


  • १४ वर्षांआतील मुले गटात प्रथम: नूतन विद्यालय सेलू तर व्दितीय जिल्हा परिषद प्रा.शाळा.शिंदे टाकळी.
  • १७ वर्षांआतील मुले गटात:- नूतन विद्यालय सेलू तर
  • व्दितीय: एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू
  • १४ वर्षाआतील मुली गटात प्रथम: जिल्हा परिषद प्रा.शा. शिंदे टाकळी. 
  • १७ वर्षातील मुली गटात: एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू.


स्पर्धा आयोजक अक्षय साळवे, रवि धोत्रे, बालाजी बाम्हणे, महादेव सांबळे, नारायण चौरे यांनी काम पाहिले. स्पर्धेस पंच म्हणून सुनील हिवाळे, अनुराग आमटी आदीने काम पाहिले.




दि. २२ नोव्हेंबर रोजी खो- खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर, प्राचार्य कार्तिक रत्नला, राष्ट्रीय खो-खो खेळाडू अनंता साळवे, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, शा.शि.शि.सं उपाध्यक्ष दिलीप सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय खो -खो पदक प्राप्त खेळाडू अनंता साळवे यांची एम.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण होऊन कक्ष अधिकारी मंञालय व  पदा निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. 





तर सेलू तालुका शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा येथे दि. २४ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कार्तिक रत्नाला प्रमुख पाहुणे  राज्य कबड्डी पटु किशनराव राठोड, शासकीय वृस्तीगृहांचे गृहपाल विजय परभणीकर , शा.शि.शि. संघटना उपाध्यक्ष दिलीप सुरवसे, पर्यवेक्षक प्रा. नागेश कान्हेकर , तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, प्रा. के.के.कदम, प्रिंन्स इंग्लिश प्राचार्य कार्तिक रत्नाला, क्रीडा मार्गदर्शक प्रशांत नाईक उपस्थित. 




कबड्डी स्पर्धा १४/१७/१९/ वर्षांखालील मुले व मुली च्या गटात स्पर्धा संपन्न झाल्या. 


  • १४ वर्षांआतील मुले गटात प्रथम: नूतन विद्यालय सेलू तर व्दितीय शांताबाई नखाते विद्यालय देवगांव फाटा.
  • १७ वर्षांआतील मुले गटात:- नूतन विद्यालय सेलू तर
  • व्दितीय: एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू
  • १४ वर्षाआतील मुली गटात प्रथम: कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू ‌: व्दितीय :-एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू
  • १७ वर्षातील मुली गटात: शांताबाई नखाते विद्यालय देवगांव फाटा. व्दितीय:-एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू
  • १९  वर्ष मुले: नूतन महाविद्यालय सेलू.



स्पर्धा आयोजक अक्षय साळवे, रवि धोञे, बालाजी बाम्हणे, महादेव सांबळे, नारायण चौरे यांनी काम पाहिले. स्पर्धेस पंच म्हणून भरत घांडगे यांनी काम पाहिले.







Post a Comment

0 Comments