Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री शिवाजी महाविद्यालयात 70 स्वयंसेवकांनी केले रक्तदान





परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयात भारतीय संविधान आणि राष्ट्रीय छात्रसेना दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात 70 स्वयंसेवकांनी रक्तदान केले. (vnsnews-24, feature, parbhani ) 




या महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग तसेच वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले. याप्रसंगी त्यांनी रक्तदानाचे महत्व सांगून सशक्त तरुणांनी रक्तदान करणे मानवी संस्कृतीसाठी आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. 





यावेळी उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ. विजया नांदापुरकर, जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. कौसडीकर आदींची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ, डॉ.तुकाराम फिसफिसे,डॉ. संतोष कोकीळ, डॉ.दिगंबर रोडे, प्रा. राजेसाहेब रेंगे, गणेश गरड आदींनी परिश्रम घेतले. (vnsnews-24, feature, parbhani ) 



 





Post a Comment

0 Comments