Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणीत ‘एकता दौड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद





परभणी ➡️ लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हास्तरावर ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. या दौडला प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. (vnsnews-24, gov, parbhani) 



सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन हा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त एकता दौड मोठ्या स्वरुपात साजरा करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले होते.




पवार यांच्यासह क्रीडा अधिकारी शैलेंद्रसिंह गौतम, सुधीर चपळगावकर, तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डेकर आणि नेहरू युवा केंद्राचे श्री. ढगे यावेळी उपस्थित होते.





राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विसावा कॉर्नर, गांधी पार्क, शिवाजी चौक, जनता मार्केट, महात्मा फुले पुतळा यामार्गाने रॅलीची जिल्हा क्रीडा संकुल येथे सांगता करण्यात आली.





एकता दौडकरिता पोलिस प्रशासनाने उत्कृष्ट बंदोबस्ताचे नियोजन केले तर आरोग्य विभागाने सहकार्य करत या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पवार यांनी एकता दिवसाची सर्वांना शपथ देत दौडची सुरुवात केली.





एकविध खेळ संघटनेचे सुशिल देशमुख, सूर्यकांत डहाळे, कैलास टेहरे, गाडेकर, सय्यद शकील, चेतन मुक्तावार, नोमान, बशीर अहेमद खान, मुन्ना खान, यमनाजी, धिरज नाईकवाडे, योगेश आदमे, प्रकाश पंडित, महेंद्र धबाले उपस्थित होते. शहरातील कबड्डी, ॲथलॅटीक्स, टेबल टेनिस, फुटबॉल असोसिएशनचे खेळाडू रशिद इंजिनिअर स्पोर्ट्स अकादमीचे पोलिस प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. (vnsnews-24, gov, parbhani) 







Post a Comment

0 Comments