Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ ह. भ. प. लक्ष्मण महाराज आळंदीकर यांचे कीर्तन व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न




🔶️डॉ. संजय रोडगे यांचे कार्य समाजोपयोगी - आ. बाबाजानी दुर्राणी

सेलू ➡️ तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथे डॉ. संजय रोडगे मित्र मंडळ आयोजित श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक तथा मार्गदर्शक डॉ. रामरावजी रोडगे यांच्या 87 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महादेव मंदिर परिसरामध्ये रविवारी 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम हिंदूसंरक्षक श्री ह. भ. प. लक्ष्मण महाराज आळंदीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. (vnsnews-24, feature, selu)






मनोगत व्यक्त करताना डॉ. संजय रोडगे म्हणाले की, मी आज जे घडलो ते माझ्या वडिलांमुळेच घडलो. त्यांच्याच आशीर्वादाने आज मी आपल्यासमोर उभा आहे. मागील 28 वर्षापासून अपूर्व हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्ण सेवा करत आलो आहोत. मागील 21 वर्षापासून श्रीराम प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक तसेच सामाजिक  कार्य करत आहोत. याबरोबरच मागील पंधरा वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. आयुष्यामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व काही माझ्याकडे आहेत. मला आता सामाजिक कार्यामध्ये समाजोपयोगी कामे करून समाजासाठी आपले काही देणे आहे आणि ते ऋण फेडण्याची माझी इच्छा आहे. परंतु सामाजिक कार्य करत असताना सोबतच राजकीय पाठबळ किंवा पद महत्त्वाचे असते. आजपर्यंत मी स्वतः कधी निवडणूकीला  उभा राहिलो नाही. सरपंच, सभापती, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, चेअरमन अशी अनेक पदे मी इतरांना देण्यासाठी मदत केली आहे. हे सर्व रवळगाव सर्कलमधील विकासाभिमुख कामे करण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे आणि अशीच आपली साथ असावी अशी आशा व्यक्त केली.(vnsnews-24, feature, selu)






अध्यक्षीय समारोप करताना आमदार बाबाजानी दर्राणी साहेब म्हणाले की, खरंच डॉ. संजय रोडगे साहेबांची सामाजिक, राजकीय, वैद्यकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी आहे. त्यांनी हा जो आपल्या वडिलांच्या 87 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कीर्तन व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. आजकाल वयोवृद्ध माणसाकडे कोणी जास्त लक्ष देत नाहीत अशा सत्कार सोहळ्यानिमित्त त्यांचा सत्कार करून खूप मोठी सामाजिक बांधिलकी डॉ. संजय रोडगे यांनी जपली आहे. त्यांच्या पाठीशी आपणही राहवे आणि त्यांना यापुढेही आमचे सहकार्य वेळोवेळी राहील असे म्हणाले. (vnsnews-24, feature, selu)







प्रसिद्ध कीर्तनकार झी. टॉकीज फेम हिंदूसंरक्षक श्री ह. भ. प. लक्ष्मण महाराज आळंदीकर यांनी आपल्या अमृतवाणीतून जनतेला असा उपदेश केला की, ज्याला स्वतःचे हित कळते अशा व्यक्तीचे मुलगा किंवा मुलीचे माता -पिता  धन्य असतात. संस्कारी व सात्विक आपत्ती जर कुटुंबामध्ये असेल तर त्याचा हेवा ईश्वराला सुद्धा वाटतो. असेच सात्विक मुले जीवनाला दिशा देणारे व समाजाचे हित साधणारे असतात. संत तुकाराम महाराज म्हणतात जर अशा सात्विक व संस्कारी लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेल. प्रत्येक व्यक्तीने जन्म घेतल्यानंतर आपल्या जीवनाचे कल्याण तसेच समाजाचे कल्याण हे कशामध्ये आहे हे ज्याला कळते असा व्यक्ती धन्य असतो या युक्तीप्रमाणेच डॉ. संजय रोडगे यांचे कार्य समाजोपयोगी असून त्यांचे व त्यांच्या मातापित्याचे जीवन खरंच धन्य आहे.







या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी, श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक तथा सत्कारमूर्ती डॉ. रामरावजी रोडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिम जिल्हा पक्ष निरीक्षक डॉ. संजय रोडगे, मराठवाडा प्रचार प्रमुख ह. भ. प. सारंगधर महाराज रोडगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सौ. निर्मला लिपणे, ह. भ. प दत्ता महाराज सोनपावले, सरपंच अशोकराव लिपणे, उपसरपंच सखारामजी नाटकर, योगीराज लिपणे, रमेश लिपने,  रामेश्वर बाप्पा लीपने, प्रल्हाद तात्या लिपणे,  डॉ. आदित्य रोडगे, पवन नाटकर, भरत नाना लहाने, श्री. संजय गटकळ, प्रकाश बप्पा गजमल, सचिन लहाने, भागवत मोगरे, एकनाथ लहाने, उत्तमराव गजमल, किसनराव बागल, राजाभाऊ बागल, कैलास दुधाटे, बद्रीभाऊ ताठे प्रल्हादराव गजमल, विश्वनाथ गजमल, मच्छिंद्र फासाटे, दीपक गजमल, अशोक चाळके, दत्ता मोगरे, राधाकिसन जावळे, आनंता जावळे,  विकास साकळकर, दीपक रोडगे सरपंच रवळगाव, अनंता रोडगे उपसरपंच रवळगाव, भरत रोडगे, गजानन रोडगे,  आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे व डीगांबर टाके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संजय रोडगे मित्र मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.(vnsnews-24, feature, selu)






Post a Comment

0 Comments