Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ 49 अनिवासी हंगामी वसतीगृहात पाल्यांचे प्रवेश करावेत - जिल्हाधिकारी





परभणी ➡️ जिल्ह्यातील एकही विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गंत ऊसतोड, विटभट्टी, दगडखाण आदी कामांसाठी गावातून तात्पुरते स्थलांतरित होत आहेत, अशा पालकांनी त्यांच्या पाल्यांचे संबंधित जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनिवासी हंगामी वसतीगृहात प्रवेश करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. (vnsnews-24, gov, parbhani ) 




परभणी जिल्ह्यातील नऊपैकी सहा तालुक्यात एकूण 49 अनिवासी हंगामी वसतीगृह सुरु करण्यासाठीचे या वर्षासाठीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये एकूण 3 हजार 173 विद्यार्थी प्रवेशित होणार आहेत. (vnsnews-24, gov, parbhani ) 






शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये हंगामी स्थलांतरित होणा-या ऊसतोड मजूर, विटभट्टी, दगडखाण मजूर हे या व इतर कामासाठी स्थलांतरित होत असतात. या स्थलांतरित होणा-या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून गावातच हंगामी वसतीगृह संबंधित जिल्हा परिषद शाळेच्या शाळा -व्यवस्थापन समितीमार्फत नियमित शाळेतच चालविले जाते. अशा मुलांना रात्रीचे भोजन व सकाळचा नाश्ता, माध्यान्ह भोजन शाळेतच उपलब्ध करुन दिले जाते. 





तर संबंधित मुलांच्या नातेवाईकाकडे किंवा त्यांच्या घरामध्ये निवासाची व्यवस्था केलेली असते, अशी माहिती जिल्हाधिकारी  गोयल यांनी दिली असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. (vnsnews-24, gov, parbhani ) 





Post a Comment

0 Comments