Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सेलूत राष्ट्रीय एकता दौड रॅली ला उदंड प्रतिसाद एकत्मतेच्या संदेशासाठी जेष्ठांसह, अधिकारी ही धावले




सेलू  ➡️ लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आयोजित "एकता दौड" रॅली ला सेलू करांचा उदंड प्रतिसाद लाभला एकत्मतेच्या संदेशासाठी जेष्ठांसह, अधिकारी ही धावले उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगर परिषद व शिक्षण व क्रीडा विभाग  पं. स. सेलू यांच्या संयुक्त विद्यमान या या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून "एकता दौड" ला उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी हिरवा झेंडा दाखवुन प्रारंभ केला.(vnsnews-24, feature, selu )  






ही रॅली क्रांती चौक, गोविंद बाबा चौक, मार्गे न.प.कार्यालय समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर ,व  स्टेशन रोडवर छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.नूतन विद्यालयात स्वातंत्र्य सेनानी कै. श्रीरामजी भांगडीया यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.

           




भारत माता की जय, वंदेमातरम्, या घोषणांनी रॅलीत एकात्मतेचे चैतन्य निर्माण केले. तसेच व्यायामाचे व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी नियमित धावणे, चालणे, फिरणे यासाठी  एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिकारी व जेष्ठ नागरिक, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक यांच्या सह, गटकळ करीअर अकॅडमीचे २०० खेळाडू एकता दौड मध्ये धावले.(vnsnews-24, feature, selu ) 







या रॅलीच्या समोर प्रसंगी उपविभागीय अधिकारी सौ अरुणा संगेवार म्हणाल्या प्रतिकुल काळात, मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीत  565 संस्थानांचे विलिनीकरण करून, देशाला एकसंघ करत " खंडप्राय संघराज्य " निर्माण करण्याचे महत्वपुर्ण कार्य लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, आजही त्यांच्या  " एकात्म विचारांची" देशाला गरज आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी केले. (vnsnews-24, feature, selu ) 





या प्रसंगी नूतन शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, जि.प चे माजी सभापती अशोक काकडे, उद्योजक नंदकिशोर बाहेती, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर, किशोर जोशी, डॉ.विलास मोरे, गंगाधर कान्हेकर, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, प्रा.डॉ.के.के.कदम, सुरेश काबरा, मुख्याध्यापक रामराव बोबडे, रामप्रसाद गोरे, प्रदिप कौसडीकर, रविंद्र पाठक,शरद ठाकर, पत्रकार रेवनअप्पा साळेगावकर,अरूण राऊत, प्रविन चंदन, रौफखान पठाण, आबासाहेब लोंढे, प्रा रामेश्वर गटकळ, पद्माकर गौंडगे, मुक्तावार, माजी सैनिक गोरखनाथ राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. (vnsnews-24, feature, selu ) 




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे तर विरेश कडगे यांनी आभार मानले. एकता रॅली च्या यशस्वीतेसाठी केजीबी चे रावसा दोहेब पदमपल्ले, रंजीत बारडकर, रंगरेज अन्सारी, रामा गायकवाड, अरूण रामपुरकर यांनी परीश्रम घेतले.







Post a Comment

0 Comments