Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत गायीच्या शेणापासून बनविल्या पर्यावरणपूर गणेशमूर्ती




परभणी ➡️ तालुक्यातील झरी येथील पद्माकर अनंतराव चव्हाण हे कुटुंबीयांसह मागील चार वर्षांपासून देशी गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार करीत आहे. 



जून ते ऑगस्टदरम्यानच्या तीन महिन्यांच्या कालावधीत पद्माकर चव्हाण, त्यांच्या पत्नी वैशाली, मुले उत्कर्षा व वेदान्त यांनी तब्बल 100 गणेशमूर्ती घरच्या घरी तयार केल्या आहेत. 



या कामी त्यांना लाकडांपासुन निरनिराळ्या कलाकृती साकारणारे शिल्पकार सेवानिवृत्त लाईनमन नामदेवराव पंडित यांचीही साथ मिळाली. 03, 06 इंचांपासून ते 14 इंचांपर्यंतच्या मूर्ती त्यांनी बनविल्या आहेत. 



शेणात 25 टक्के शाडू माती मिसळून मूर्तीच्या मजबुतीसाठी गवार बी वापरल्याचे पद्माकर चव्हाण यांनी सांगितले. परभणी येथील नीरज इंटरनॅशनल येथे 30 ऑगस्टपासून  या मूर्तींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.  नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












Post a Comment

0 Comments