Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳️ परभणीत जिल्हास्तरीय शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा संपन्न




 


परभणी
➡️ रिलायन्स फाउंडेशन च्या मार्गदर्शनाखाली तसेच उमेद, स्मार्ट प्रकल्प, आत्मा विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्यातून परभणी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी व स्मार्ट अंतर्गत स्थापन होत असलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी कार्यशाळेचे आयोजन वसमत रोड स्थित हॉटेल फार्चुन येथे 26 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत करण्यात आले होते.


परभणी जिल्ह्यात मागील काही वर्षात बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत.परंतु काही तांत्रिक अथवा इतर कारणांस्तव पाहिजे त्या प्रमाणात वाटचाल या कंपन्या करू शकलेल्या नाहीत. यासाठी रिलायन्स फाउंडेशन शासनाच्या मदतीने या कंपन्यांच्या बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.याच उद्देशाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 




यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून आत्माचे  तथा स्मार्ट प्रकल्पाचे नोडल ऑफिसर बळीराम कच्छवे सर,उमेद चे जिल्हा प्रमुख.दीपक दहे, स्मार्टचे रवींद्र सुरासे व रामप्रभु कोरके, पाथरी पंचायत समितीचे  माजी सभापती शिवदास थोरात साहेब,रिलायन्स फाउंडेशन चे राज्य प्रमुख आदरणीय.नितीन शर्मा व मार्केटिंग प्रमुख आदरणीय आशुतोष देशपांडे, अजंता कंपनीचे संचालक रोहिदास निरस उपस्थित होते.




सर्वांनी उपस्थित शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी व प्रभाग संघ व ग्रामसंघाच्या महिलांना शेतकरी उत्पादक कंपनीची गरज,महत्व,संधी,संघटन,बळकटीकरण,स्थापनेची प्रक्रिया,कंपन्यांना अर्थसहाय्य,मार्केट लिंकेजेस, मार्केटिंग, विविध प्रक्रिया उद्योग,शासकीय योजना व अनुदान तसेच भविष्यातील वाटचाल आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळे दरम्यान उपस्थितांनी आपल्या शंका,प्रश्न विचारून मार्गदर्शकांनी त्यावर मार्गदर्शन केले. शेवटी कंपनी चे प्रतिनिधी व महिलांनी कार्यशाळेसाठी रिलायन्स फाउंडेशन व सर्व शासकीय विभागांचे आभार मानले.

कार्यशाळेसाठी परभणी जिल्ह्यातील 24 कंपन्यांचे प्रतिनिधी,9 प्रभाग व ग्रामसंघाच्या महिला प्रतिनिधी ,उमेद चे कर्मचारी,NGO प्रतिनिधी म्हणून आर्यनंदी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन चे श्रीकांत अंबुरे असे एकूण 99 लोक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments