Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰 जल जीवन मिशनसाठी जिल्हाधिकारी, सीईओ यांचा सरपंच - ग्रामसेवकांशी संवाद




परभणी ➡️ जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जिंतूर - सेलू तालुक्यातील 65 गावांमध्ये प्रादेशिक नळ योजना कार्यान्वित करण्यासाठी तसेच हर घर जल उत्सव मोहिम राबविण्यासाठी परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जिंतूर आणि सेलू तालुक्यातील सरपंच - ग्रामसेवक मंडळींशी त्यांच्या अडचणी सोडवत संवाद साधला.



बुधवार दि 27 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती जिंतूर येथील सभागृहात जिंतूर - सेलू तालुक्यातील 65 गावांच्या सरपंच - ग्रामसेवकांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.



यावेळी संवाद बैठकीसाठी स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार, तहसीलदार सखाराम मांडवगडे, महिला व बाल कल्याणचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, सहाय्यक भूवैज्ञानिक श्रीमती हुरणे, गट विकास अधिकारी विष्णू मोरे यांच्यासह आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



🏵 सरपंच - ग्रामसेवकांच्या अडचणींची केली सोडवणूक

जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सरपंच - ग्रामसेवकांनी उपस्थित केलेल्या अडचणीची सोडवणूक करत या ग्रामपंचायतींना कार्यरंभ आदेश देण्या बाबत संबंधित विभागाला सूचित केले आहे.



भूपृष्ठावरुन भौगोलिक परिस्थितीनुसार छोट्या चार ते पाच गावांच्या प्रादेशिक योजना व जेथे स्वतंत्र नळ योजना अस्तित्वात आहे अशा ठिकाणी भूजलावर आधारित स्वतंत्र योजना गावकऱ्यांच्या सहमतीने घेण्यात याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.







Post a Comment

0 Comments