Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

बँकांनी शेतक-यांना पिककर्ज वाटपाचे गती वाढवावी, जिल्हाधिका-यांचे सर्व बँकांना निर्देश




 ▶️  24 हजार शेतक-यांना 300 कोटीचे वाटप

 ▶️  जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक 

वर्धा ➡️ खरीप हंगाम शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. पेरणीसाठी शेतक-यांना वेळेवर पिककर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वच बँकांनी पिककर्ज वाटपाची आपली गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिले. जिल्हयात आतापर्यंत 24 हजार शेतक-यांना 300 कोटी रुपयाचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे. 



बैठकीला जिल्हाधिका-यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, रिजर्व बँकेचे जिल्हा अग्रणी अधिकारी राजकुमार जयस्वाल, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाने यांच्यासह सर्वच बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. 




शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध झाल्यास ते वेळेवर पेरणीचे नियोजन करु शकतात. त्यामुळे सर्व पात्र शेतक-यांना कर्ज वितरीत करण्यात यावे. जे शेतकरी नुतणीकरणासाठी पात्र आहे. अशा शेतक-यांना कर्ज उपलब्ध होऊ शकत असल्याचे लेखी कळविण्यात यावे. कर्ज वाटपाचा दैनिक आढावा घेण्यात यावा. ज्या ठिकाणी कर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणी पिककर्ज वाटप मेळावे घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व बँकांना केले. 




जिल्ह्यात विविध राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांच्या वतीने पिककर्ज वाटप केले जाते. संबंधित बँकांच्या शाखांना लगतच्या गावातील शेतक-यांना जोडून देण्यात आले असून वेळेत पिककर्ज देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे. जिल्हयात विविध शासकीय बँकांच्या 135 शाखाच्या वतीने कर्ज वाटप केले जात असून बँक ऑफ इंडिया कर्ज वाटपात आघाडीवर आहे. या बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या 76 टक्के वाटप केले आहे. त्यात 11 हजार शेतकरी व 117 कोटी रुपयाच्या वाटपाचा समावेश आहे. 




आतापर्यंत झालेल्या पिककर्ज वाटपामध्ये ॲक्सीस बँक 27 शेतक-यांना 26 लाखाचे कर्ज वाटप, बँक ऑफ बडोदा 900 शेतकरी 12 कोटीचे वाटप, बँक ऑफ महाराष्ट्र 3 हजार 100 शेतकरी 44 कोटी 50 लाख, कॅनरा बँक 500 शेतकरी 5 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 1 हजार  शेतकरी 11 कोटी वाटप, इंडियन बँक 480 शेतकरी 6 कोटी 30 लाख, एचडीएफसी बँक 530 शेतकरी 10 कोटी 50 लाख, आयसीआयसीआय बँक 180 शेतकरी 2 कोटी 20 लाख, आयडीबीआय बँक 100 शेतकरी 1 कोटी 37 लाख, इंडियन ओव्हरसीज बँक 50 शेतकरी 57 लाख, पंजाब नॅशनल बँक 750 शेतकरी 12 कोटी 55 लाख, स्टेट बँक ऑफ इंडिया 4 हजार 100 शेतकरी 51 कोटी, युको बँक 50 शेतकरी 61 लाख, युनियन बँक 640 शेतकरी 8 कोटी 85 लाख तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने 1 हजार 320 शेतक-यांना 17 कोटी 85 लाखांचे कर्ज वाटप केले आहे. 




यावेळी जिल्हाधिका-यांनी विविध शासकीय योजनेंतर्गत बँकांकडून लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दयावयाच्या कर्ज वाटपाचा देखील आढावा घेतला. यावर्षी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हयाला चांगले उद्दिष्ठ प्राप्त झाले आहे. या योजनेतून 1 हजार नवीन उद्योजक यावर्षी आपल्या निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी बँकांनी चांगले कर्ज वाटप करुन सहकार्य करावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बँकांना केल्या.  

 




Post a Comment

0 Comments