Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पेठशिवणी ग्रामस्थांच्या वतीने जि. प. शाळेच्या शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न




 

पालम ➡️ तालुक्यातील पेठशिवणी येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचा यावर्षीचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 97 टक्के लागला असल्याने ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांचा  सत्कार कार्यक्रम मंगळवारी दिनांक 27 जून रोजी शाळेतील घेण्यात आला.



या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी पेठ शिवणी गावातील ज्येष्ठ नागरिक प्रल्हादराव व्हंडाळे तर सत्कार मूर्ती म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मारुती सूर्यवंशी, सहशिक्षक नामदेव पोले, सुदाम मुदामे,शिवाजी पाटील,श्याम करंजे, इगवे,श्रीमती दासरवाड, सेवक श्रीमती मुंडे आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. यावेळी पेठशिवणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कारमूर्ती मान्यवर मंडळीचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.




या कार्यक्रमाचे प्रास्ताविकाता पत्रकार भगवान करंजे बोलताना म्हणाले की,परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या काही शाळेची दयनीय अवस्था असून जिल्हा परिषद च्या सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.आपल्यापेक्षा गावातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा गावकऱ्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा आणि शाळेच्या शिक्षकाचा समन्वय असावा जेणेकरून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी निर्माण होणाऱ्या समस्या सोडण्यासाठी सोप्या जातील.शाळेचे नाव गुणवत्तेमुळे टिकून राहील.




यावेळी सत्काराला उत्तर देताना शाळेचे मुख्याध्यापक मारुती सूर्यवंशी सर म्हणाले की,विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आम्ही अखंड परिश्रम घेऊन गावकऱ्यात आमच्याबद्दल असलेला सार्थ विश्वास आम्ही निकालाच्या माध्यमातून टिकून ठेवत जाउ,तसेच शाळेला विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. शाळेचे मुख्याध्यापक पद रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आम्हाला कसरत करावी लागते. पिण्याच्या पाण्याचे शाळेतील फिल्टर दुरुस्ती अभावी बंद आहे.




यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान तयार करून द्यावी अशा प्रकारची अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला पेठ शिवणी ग्रामपंचायतचे सदस्य बालाजी बर्डे, राजेश्वर गाडे, प्रभाकर शिनगारे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश शिनगारे, शिक्षणप्रेमी सुरेश सोनटक्के ,दत्तराव करंजे, रमेश शिनगारे, नागनाथ भालेराव, जितेंद्र वाघमारे, गोपीनाथ शिनगारे आदी मंडळी या वेळी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments