Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

देगलूर आगारातून आषाढी वारीसाठी 31 बसेस जाणार - आगार व्यवस्थापक




 

❇️40 भाविकांसाठी गावातच एसटी पाठवणार

देगलूर ➡️ कोरोना महामारीचे निर्बंध शिथील केल्यानंतर दोन वर्षानंतर यावर्षी होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या तालुक्यातील भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या देगलूर आगाराच्या वतीने ३१ बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रविन्द्र पाटील यांनी दिली. 





प्रतिवर्षी आषाढी पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यात्रेकरूंसाठी सोडण्यात येतात. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे आषाढी यात्रा बंद होती. त्यामुळे या वर्षी मोठ्या संख्येने भाविक जाणार असल्याचे लक्षात घेऊन देगलूर आगाराने ३१ बसेस सोडण्याचे निश्चित केले आहे. 




देगलूर आगारात ६० बस आहेत त्यापैकी ०३ बस नांदेड येथे वर्कशॉप ला जा ये करतात. तसेच मानव विकास मिशन अंतर्गत तालुक्यात ०७ बस दररोज सोडण्यात येतात. दि. १० जुलै रोजी आषाढी यात्रा असल्याने  ०६ जुलै ते १४ जुलै या कालावधीत देगलूर आगारातून पंढरपूरला जाण्यासाठी ३१ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 




जसे जसे प्रवाशी मिळतील तसे पंढरपूरसाठी बस सोडण्यात येणार आहे. ०६ ते १४ जुलै या कालावधीत ग्रामीण भागातील बसेस बंद करण्यात येणार असून सोलापूर, पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद व नांदेड आदि मार्गावर १९ बस धावणार आहेत. आषाढी यात्रेसाठी ज्या गावातील ४० ते ४५ यात्रेकरू पंढरपूरला जाणार आहेत अशांनी गट करून आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधल्यास त्यांना त्यांच्या गावातूनच पंढरपूर येथे नेण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रविन्द्र पाटील यांनी दिली.








Post a Comment

0 Comments